+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustग्रंथ जगण्याची प्रेरणा देतात : समीर देशपांडे; करवीर नगर वाचन मंदिरात वाचन प्रेरणा दिन adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त
schedule15 Oct 24 person by visibility 246 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : सरनाईक कॉलनी येथील आदर्श प्रशालेत वाचन प्रेरणा दिन आणि वृत्तपत्र विक्रेता सन्मानदिन साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी. पी. सुतार यांनी केले . प्रमुख अतिथींच्या हस्ते डॉक्टर ए .पी .जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

छावा संघटनेचे अध्यक्ष राजू सावंत यांच्या हस्ते ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेता रवी लाड यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला . आरोग्य सेवक - पत्रकार राजेंद्र मकोटे यांनी आपल्या मनोगतात वाचनाने मनुष्य समृद्ध होतो यासाठी अनेक पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे असे नमूद केले . वृत्तपत्र विक्रेता रवी लाड यांनी आपल्या मनोगतात वृत्तपत्र वाटप कसे केले जाते याबाबत तसेच आपले जीवन समृद्ध करण्यासाठी कोणती पुस्तके वाचली पाहिजेत याबाबत काही पुस्तकांचे नावेही सांगितली .

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राजू सावंत यांनी आदर्श प्रशालेच्या विविध उपक्रमांचे कौतुक करून विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन करावे असे आवाहन केले . आभार संगीता शिंदे यांनी मानले .