+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule15 Oct 24 person by visibility 176 categoryराज्य
कोल्हापूर : विभागीय क्रीडा संकुल, कोल्हापूर येथे इंडोकाउंट फाउंडेशन, एम.आय.डी.सी. गोकुळ शिरगाव यांच्या सीएसआर फंडातून अद्यावत अशी आंतराष्ट्रीय दर्जाची व्यायामशाळा उभारण्यात आली आहे. ही व्यायामशाळा खेळाडूंसाठी व नागरिकांसाठी दि.14 ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आली आहे.

 व्यायामशाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी नाव नोंदणी सुरु झाली आहे. जे खेळाडू, नागरीक व्यायामशाळा प्रवेशासाठी दि. 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत नाव नोंदणी करतील त्यांना पहिल्या महिन्यासाठी फी मध्ये 50 टक्के सवलत देऊन 500 रुपये इतकी फी आकारण्यात येईल, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा विभागाचे विभागीय उपसंचालक माणिक पाटील यांनी केले आहे.

यासाठी श्री छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल, कोल्हापूर समितीकडून प्रति महिना फी 1 हजार रुपये, 3 महिन्याची एकत्रित फी भरल्यास 2 हजार 500 रुपये, 6 महिन्याची एकत्रित फी भरल्यास 4 हजार 500 रुपये व 12 महिन्याची एकत्रित वार्षिक फी भरल्यास 7 हजार रुपये फी आकारण्यात येणार आहे, असेही पाटील यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.