+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustग्रंथ जगण्याची प्रेरणा देतात : समीर देशपांडे; करवीर नगर वाचन मंदिरात वाचन प्रेरणा दिन adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त
schedule01 Oct 24 person by visibility 307 categoryक्रीडा
अतिग्रे : वागड ग्लोबल स्कूल वाशी, मुंबई येथे २५ ते २९ सप्टेंबर दरम्यान झालेल्या सीबीएससी क्लस्टर फुटबॉल IX स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या १९ वर्षाखालील गटाने बाजी मारत अजिंक्यपद पटकावले. या संघाची भोपाळ मध्यप्रदेश या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 

या स्पर्धेत ८३ शाळा सहभागी झाल्या होत्या, ज्यामध्ये १९ वर्षाखालील गटात २८ संघांनी आपले कर्तृत्व दाखवले.अंतिम सामन्यात संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आर्मी पब्लिक स्कूल पुणे या संघाला १-० ने हरवून सुवर्णपदक प्राप्त केले.

स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली, आणि दिव-दमन या राज्यांतील सीबीएससी शाळा सहभागी झाल्या. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या वेदांत गायकवाड याला 'बेस्ट प्लेयर ऑफ टूर्नामेंट' आणि अखिलेश गाडगीळ याला 'गोल्डन बूट' मिळाले. प्रशिक्षक दिनूसिंग यांचे मार्गदर्शन संघाला लाभले, तर दिग्विजयसिंग शिंदे हे संघाचे मॅनेजर होते.

संस्थापक संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, संचालिका प्राचार्या सास्मिता मोहंती, आणि क्रीडा संचालक विठ्ठल केंचन्नावर यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले व राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.