+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule26 Jul 24 person by visibility 329 categoryराजकीय
 कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत जागा वाटपाबरोबर पक्षांतर्गत महत्वाचे निर्णय घेण्यासाठी काँग्रेसने समन्वय समितीची स्थापना केली असून यात माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे.

राज्यातील विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिन्ही पक्षात जागा वाटपांबाबत समन्वय असावा यासाठी काँग्रेसने समन्वय समितीची स्थापना केली आहे. ही समिती निवडणुकीपूर्वी महत्त्वाचे निर्णय घेईल. व महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये समन्वय राखण्याचा प्रयत्न करेल. 

यात काँग्रेसच्यावतीने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, आमदार सतेज पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान व नितीन राऊत यांचा समावेश केला आहे.