कोल्हापूर : चोरी करणाऱ्या एका गुन्हेगारास पकडून त्याचेकडून 45 ग्रॅम सोन्याचे दागिन्यांसह एकूण दोन लाख 47 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याप्रकरणी पृथ्वीराज प्रकाश बोरगे, (वय 22, रा. यवलूज, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) यासाठी करण्यात आली ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरने केली.
दि.01 जानेवारी रोजी सचिन कृष्णात बोरगे, (वय 35, रा. इंगळे गल्ली, मस्जिदचे मागे, यवलुज, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) यांचे घराच्या उघड्या दरवाजातून अज्ञाताने येऊन घरातील तिजोरी उघडून त्यातील सोन्याचे दानिगे व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरुन नेला होता याबाबत पन्हाळा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला होता.
याबाबत वरील तपास पथकातील पोलीस अमंलदार संभाजी भोसले यांना आज रोजी त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, वर नमुद गुन्हा हा फिर्यादी यांचे गल्लीतच राहणारा आरोपी पृथ्वीराज प्रकाश बोरगे, व. व. 22, रा. यवलूज, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर याने केला असून तो नमुद गुन्ह्यातील चोरलेले सोन्याचे दागिने विक्री करणे करीता सीडी-100 मोटर सायकल नं. एमएच-09- बी-6935 वरून भेंडे गल्ली, गुजरी, कोल्हापूर येथील वसंत हॉस्पिटल समोर येणार आहे.
या मिळाले माहितीचे अनुषंगाने नमुद तपास पथकाने आज दि.05 फेब्रुवारी रोजी भेंडे गल्ली, गुजरी, कोल्हापूर येथील वसंत हॉस्पिटल समोर जावून सापळा लावून आरोपी नामे पृथ्वीराज प्रकाश बोरगे यास पकडून त्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडे पन्हाळा पोलीस ठाणेस दाखल असले गुन्ह्यातील चोरुन नेलेले 45 ग्रॅमचे सोन्याचे दागीने व इतर साहित्य असा एकूण 2,47,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला. आरोपीस जप्त मुद्देमालासह पुढील तपासकामी पन्हाळा पोलीस ठाणे यांचे ताब्यात देणेत आले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, महादेव वाघमोडे, तसेच पोलीस अंमलदार राजीव शिंदे, संभाजी भोसले, बालाजी पाटील व संतोष पाटील यांनी केली आहे.