+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule25 Jul 24 person by visibility 522 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनॉमास) अभियांत्रिकी महाविद्यालयातील केमिकल इंजिनिअरिंग तृतीय वर्षातील अक्षय सबनीस व हर्षवर्धन कदम या दोन विद्यार्थ्यांची मलेशियामधील पेट्रोनॉस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विद्यापीठात संशोधनासाठी निवड झाली. हे विद्यार्थी जून पासून मलेशिया विद्यापीठात राहून संशोधन करत आहेत. कोरे अभियांत्रिकीच्या रिसर्च आणि डेव्हपमेंट सेलच्या माध्यमातुन विद्यार्थ्याना ही संधी मिळाली आहे.

अक्षय सबनीस हा विद्यार्थी हायड्रेट बेस्ट मिटीगेशन टेक्नॉलॉजी या विषयावर तर हर्षवर्धन कदम हा गॅस हायड्रेट बेस्ट डी सलाईनेशन प्रोसेस या विषयावरती संशोधन करणार आहे. मलेशियामधील पेट्रोनॉस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विद्यापीठातील प्रोफेसर डॉ. भजनलाल त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

 या संशोधनामुळे या विद्यार्थ्यांना जागतिक नोकरीच्या संधी, संशोधनाच्या संधी आणि उच्च शिक्षणासाठी संधी उपलब्ध होणार आहे.वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष, डॉ. विनय कोरे यांनी या विद्यार्थ्याचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे, मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. व्ही. व्ही.कारजिन्नी, डॉ. एस. एम. पिसे, डीन, प्रभारी प्राचार्य, डॉ.डी.एन.माने, विभागप्रमुख, डॉ. के. आय. पाटील, डॉ. यू. बी. देशांन्नवर यांचें मार्गदर्शन लाभले.