संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये स्कूल कनेक्ट कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
schedule10 Dec 25 person by visibility 60 categoryशैक्षणिक
▪️करिअर निवडताना उद्दिष्ट निश्चित करा डॉ. विराट गिरी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
अतिग्रे : संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या “स्कूल कनेक्ट करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाला” विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील विविध माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमधील ७,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी इन्स्टिट्यूटला भेट देत तांत्रिक शिक्षणाच्या विविध संधींचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
या मार्गदर्शन सत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना म्हटले की,
“दहावी-बारावीनंतर करिअर निवडताना विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम स्वतःची उद्दिष्टे निश्चित केली पाहिजेत. उद्दिष्ट नसलेल्या प्रवासाला दिशा नसते. रोजगार निर्माण करणे किंवा स्वतःचा उद्योग उभारणे हे स्वप्न साकार करण्यासाठी एमएसबीटीइ नेमून दिलेले अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवतात.”
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला केंद्रस्थानी ठेवून कौशल्याधारित अभ्यासक्रमांची रचना केली आहे. आज हजारो विद्यार्थी या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून यशस्वी होत असून तांत्रिक क्षेत्रात नवे मानदंड निर्माण करत आहेत.
संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये उपलब्ध असलेल्या विविध तांत्रिक शाखा, आधुनिक प्रयोगशाळा, अत्याधुनिक सुविधा तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी कॅम्पस भेटीदरम्यान मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल,आयटीआय, डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट टर्म कोर्सेस. आदी विभागांची सखोल माहिती घेतली.
शाळांमधील विद्यार्थ्यांना करिअर जागरूकतेसाठी अशा प्रकारचे व्यापक उपक्रम राबवणे ही काळाची गरज असल्याचेही डॉ. गिरी यांनी अधोरेखित केले.
या कार्यक्रमाचे नियोजन संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या प्रवेश विभागाचे प्रमुख प्रा. नितीन जाधव, प्रा. विशाल तेली, शाहीर कोळेकर, संदीप पिंपळे तसेच इन्स्टिट्यूटच्या सर्व टीमने अत्यंत मेहनतीने केले.
कार्यक्रमाचे आयोजन संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांच्या प्रेरणेतून करण्यात आले होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये करिअर संदर्भातील जागरूकता तांत्रिक शिक्षणाबद्दल उत्सुकता योग्य करिअर निवडीचे महत्त्व
या बाबींविषयी नवी दृष्टी निर्माण होणार आहे.