+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustग्रंथ जगण्याची प्रेरणा देतात : समीर देशपांडे; करवीर नगर वाचन मंदिरात वाचन प्रेरणा दिन adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त
schedule21 Sep 24 person by visibility 373 categoryक्रीडा
वारणानगर : वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनोमस) अभियांत्रिकी महाविद्यालयाने आष्टा, जि. सांगली येथे झालेल्या शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय महिला बास्केटबाँल स्पर्धत विजेतेपद पटकाविले, अंतिम सामन्यात वालचंद कॉलेज ऑफ इंजि. महाविद्यालयाचा पराभव करीत विजेतेपद मिळविले. तसेच पूर्वा भोसले हिला बेस्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. 

संघामध्ये पुर्वा भोसले, मनस्वी मोरे, निर्झरा पाटील जाधव, श्रावणी भोसले, अनन्या संदे, वृषाली निकम, वैष्णवी अडनाईक, श्रेया जाधव, प्रेरणा पाटील, कृष्णाली पाटील, आर्या पाटील, सम्राज्ञी पाटील या खेळाडूंचा समावेश होता. 

या खेळाडूना श्री वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे, अध्यक्ष आमदार विनय कोरे, श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे, मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी, अधिष्ठाता, डॉ. एस. एम. पिसे, तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. डी. एन. माने यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच क्रीडा प्रशिक्षक श्री उदय पाटील व श्री. सागर चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.