+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule09 Jul 24 person by visibility 465 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने आपत्ती व्यवस्थापन 2024 च्या डायरीचे आज प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. हे प्रकाशन दुपारी आयुक्त कार्यालयात करण्यात आले. या प्रकाशनावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, एन.एस.पाटील, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, भांडार अधिक्षक प्रिती घाटोळे, कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले उपस्थितीत होते.

 या डायरीमध्ये अग्निशमन विभागाचे कंट्रोल रूम व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे, अधिकारी व कर्मचा-यांचे नंबर देण्यात आले आहे. तसेच पावसाळा पुर्व उपाययोजना, विभागनिहाय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, पावसाळा कालावधी नंतरच्या उपाययोजना, राजाराम बंधारा पूर पातळी, संभाव्य पाणी येणारी ठिकाणे, निवारा केंद्राची माहिती, अग्निशमन विभागाकडील पूर नियोजनासंदर्भात माहिती, विभागीय कार्यालय क्रं.1 ते 4 कडील निवारा केंद्रांमध्ये नेमण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी यांची माहिती, उद्यान विभागाकडील अधिकारी कर्मचारी यांची माहिती, पार्किंग व जनावरांनसाठी ओपन स्पेस, 

महापालिका क्षेत्रातील नियंत्रण कक्षाची माहिती, आपत्ती व्यवस्थापन उपलब्ध साधनांची माहिती, शहरातील बोटींग क्लबची माहिती, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय व महावितरण ते मंडळ स्तरीय अधिकाऱ्यांची संपर्क यादी, सामाजिक सेवा संस्थाची यादी, हवामान खाते, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रादेशिक कार्यालय, जखमी, आजारी पक्षी व प्राणी उपचाराची माहिती, पोलिस विभागातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची माहिती, राष्ट्रीय महामार्ग विभाग, जलसंपदा, पाटबांधारे, अधिक्षक अभियंता यांत्रिकी मंडळ, मृद व जलसंधारण विभागांची माहिती, पावसाळा 2024 सावधानतेच्या जाहिर सूचना, पंचगंगा नदीची पाण्याची पातळी वाढण्यापुर्वी करावयाच्या उपाययोजना व संभाव्य पूरपरिस्थितीला सामोरे जाताना व्यवसाईक, व्यापाऱ्यांनी घ्यावयाची काळजी हि सर्व माहिती या आपत्ती व्यवस्थापन डायरीमध्ये देण्यात आलेली आहे.