+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule30 Sep 24 person by visibility 241 categoryदेश
नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड चर्चेत आली आहे या पदासाठी दोन नेत्यांची नावे शर्यतीत आहेत त्यात राजस्थानच्या दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या वसुंधरा राजे यांचे नाव चर्चेत आले आहे.

अध्यक्षपदासाठी वसुंधरा राजे यांच्याशिवाय मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि संजय जोशी यांचीही नावे चर्चेत आहेत. या नावांमध्ये वसुंधरा राजे यांच्या नावाला आरएसएस प्राधान्य देत असल्याचे काही राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हे खरे असेल तर वसुंधरा बांना भाजप अध्यक्ष होणे सोपे जाणार आहे.मात्र पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते त्यांच्या नावावर सहमत नाहीत.

 पंतप्रधान मोदी आणि संजय जोशी यांच्यातील मतभेद जग जाहीर आहेत २०१२ मध्ये नरेंद्र मोदी यूपी विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी गेले नव्हते. कारण संजय जोशी तिथे समन्वयक होते, यावरून त्यांच्यातील संबंध कसे आहेत. याचा अंदाज येतो. अशा स्थितीत वसुंधरा राजेच आघाडीवर असल्याचे दिसत आहे. 

तसेच मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे, त्यांची स्वच्छ प्रतिमा आणि आरएसएसशी चांगली जवळीक आहे. अमित शहा आणि पंतप्रधान मोदींसोबतही त्यांचे संबंध चांगले आहेत. यामुळे त्यांचीही दावेदारी मजबूत आहे.