+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule15 Jul 24 person by visibility 301 categoryमहानगरपालिका
 कोल्हापूर : महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेतून शहरातील सोळा रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातील पाच रस्त्यांचे काम एवरेस्ट कंपनीने सुरु केले आहे. एस्टीमेट प्रमाणे काम व्हावे, तसेच रस्त्यांचा दर्जा टिकावा यासाठी आम आदमी पार्टीकडून या कामाचा पाठपुरावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. 

रस्त्याचा दर्जाचा राखला जावा यासाठी सेहचाळीस वेगवेगळ्या चाचण्या करायच्या आहेत. रस्त्यामधील डांबराचे प्रमाणे मोजणारी सर्वात महत्वाची अशी बिटूमीन कंटेन्ट चाचणी देखील यामध्ये समाविष्ट आहे. रस्ते करून महिना उलटला तरी ही चाचणी का केली गेली नाही, यामागे काही गौडबंगाल आहे का असा सवाल आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी महापालिका प्रशासनाला केला. यावर सल्लागार कंपनीच्या कसबेकर यांनी याबाबत कंत्राटदाराला वेळोवेळी कळवले तरी त्यांचा प्रतिनिधी उपस्थित राहत नसल्याने ही चाचणी होऊ शकली नसल्याचे मान्य केले. 

पाच रस्त्यापैकी ज्यावर गटार चॅनेल आहेत, तिथे संपूर्ण रुंदीला रस्ता केला आहे. गटार करताना रस्ता परत उकरला जाणार, हे म्हणजे वरातीमागून घोडे असा प्रकार आहे. शासनाने दिलेल्या निर्देशांमध्ये स्पष्ट उल्लेख असताना युटीलिटी किंवा गटार करण्यासाठी रस्ते उकरल्यास त्याचा खर्च अधिकाऱ्यांच्या खिशातून घ्यावा अशी मागणी देसाई यांनी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्याकडे केली.

यावर शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी येथून पुढच्या कामात गटार चॅनेलचे काम आधी करणार असल्याचे सांगतिले.

चप्पल लाईनच्या रस्त्याचे काम गतीने करावे, ताराबाई पार्क येथील दामिनी हॉटेल समोरील रस्त्याचे त्वरित रिस्टोरेशन करावे, अन्यथा आंदोलन करू असा इशारा शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी केली.

कावळा नाका येथील नियाज हॉटेल समोरील रस्ता, यादवनगर चौक, प्रतिभानगर येथील हवामहल रस्ता, तसेच सेव्हन्थ डे शाळेच्या रस्त्यावर खड्ड्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. हे रस्ते तातडीने दुरुस्त करावेत अशी मागणी आप शिष्ट मंडळाने केली. 

शंभर कोटींच्या रस्ते विषयावर पंधरा दिवसांनी पुन्हा बैठक घेण्याचे ठरले. यावेळी जल अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर अभियंता आर के पाटील, महादेव फुलारी, सतीश फप्पे, सुरेश पाटील, आप चे शहर महासचिव अभिजित कांबळे,मोईन मोकाशी,मयुर भोसले, दुशंत माने, सुधाकर शिंदे, उमेश वडर, वल्लभ पाटील, फिरोज सतारमेकर आदी उपस्थित होते.