परराज्यातील अवैध मद्य वाहतूकप्रकरणी कारवाई; १ कोटी ७२ लाखाचा मुद्देमाल जप्त
schedule30 Jan 26 person by visibility 91 categoryगुन्हे
मुंबई : ठाणे जिल्ह्यातील मुंबई–नाशिक महामार्ग, सोनाळे गावच्या हद्दीत एच.पी पेट्रोल पंपाजवळ (ता. भिवंडी) परराज्यातील मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर २७ जानेवारी रोजी कारवाई करण्यात आली.
या कारवाईत गोवा राज्यात निर्मित महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेल्या रॉयल ब्ल्यु माल्ट व्हिस्की ब्रॅण्ड मद्याचे १४०० बॉक्स अर्थात १८० मि.ली क्षमतेच्या ६७ हजार २०० बाटल्या दारूबंदी कायद्यातंर्गत जप्त करण्यात आल्या. तसेच आयशर कंपनीच्या एमएच ०४ एलवाय ४१३३ क्रमांक असलेल्या सहाचाकी वाहनासह, एक मोबाईल फोन असा एकूण १ कोटी ७२ लाख ९४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत श्रवणकुमार कृष्णराम पंवार, रा. सगडवा, पो. डावल, ता. चीतलवाना, जि. जालोर (राजस्थान) यास अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, कोकण विभागाचे विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार, ठाणे यांच्या कारवाईच्या दिलेल्या निर्देशानुसार व दुय्यम निरीक्षक दिगंबर शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. कारवाईमध्ये दुय्यम निरीक्षक रिंकेश दांगट, दुय्यम निरीक्षक व्ही. व्ही. सकपाळ, दुय्यम निरीक्षक एच. बी यादव, सहायक दुय्यम निरीक्षक महावीर कोळेकर, तसेच जवान हुनमंत गाढवे, हर्षल खरबस, अमीत सानप, श्रीराम राठोड, कुणाल तडवी, सागर चौधरी यांचा सहभाग होता.
या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक रिंकेश दांगट करीत आहे, असे विभागीय भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक यांनी कळविले आहे.