कोल्हापूर : कसबा बावडा त्र्यंबोलीनगर मधील चॅनलमधून चार टन प्लॅस्टिक बॉटल, गाळ व इतर कचरा उठाव
schedule03 Apr 25 person by visibility 181 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कसबा बावडा येथील कोर्टाच्या समोरील बाजूस असलल्या त्र्यंबोलीनगर मधील चॅनलमधून आज आरोग्य विभागाच्यावतीने चार टन प्लॅस्टीक बॉटल, गाळ व इतर कचरा काढण्यात आला.
प्रशासक के.मंजूलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली पावसाळा पूर्व नालेसफाई मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेअंतर्गत प्रभाग क्रमांक 4 कसबा बावडा येथील भगवा चौक पोलीस स्टेशन जवळील अख्खा मसूर हॉटेल जवळ चॅनलची सफाई आज करण्यात आली. या चॅनलध्ये प्लॅस्टीक पाण्याच्या बाटल्या व कचरा मोठया प्रमाणात साचला होता. त्यामुळे चॅनेलमधील पाणी बाहेर रस्त्यावर वाहत होते. सकाळी महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या व जेसीबीच्या सहाय्याने हा चॅनल साफ करुन प्लॅस्टीक पाण्याच्या बाटल्या व गाळ काढण्यात आल्या. यामध्ये चार टन प्लॅस्टिक बाटल्या, गाळ व इतर कचरा काढण्यात आल्या. सकाळी या कामाची पाहणी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी केली.
यावेळी आरोग्य निरिक्षक मुकादम नंदकुमार कांबळे, मुकादम व कर्मचारी उपस्थित होते.