SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
"भीमा कृषी प्रदर्शनाच्या शनिवारच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांसह नागरिकांची ,शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची तुफान गर्दीगारगोटीत 'जिल्हा ग्रंथोत्सव २०२५' चा दिमाखात शुभारंभ; ग्रंथदिंडीने वेधले लक्षकृषी प्रदर्शन-कराओके गायन स्पर्धा : आदिती भराडे, वसिम मुजावर यांनी पटकावला प्रथम क्रमांकअतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांची घोडावत विद्यापीठाला सदिच्छा भेटभिमा कृषी प्रदर्शनात भागीरथी महिला संस्थेच्यावतीने मोफत झुणका-भाकरी वाटपमहाविकास आघाडीच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांचा सोमवारी सत्कारदक्षिण-पश्चिम विभागीय युवा महोत्सवात शिवाजी विद्यापीठ संघाचे घवघवीत यशभाजपच्या जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांचा उद्या रविवारी सत्कारशाश्वत विकासासाठी संशोधन ही रसायनशास्त्राची सामाजिक, नैतिक जबाबदारी: डॉ. इंद्रजीत घोष; शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र परिषदडी. वाय. पाटील कृषी विद्यापीठात लवकरच ‘एमबीए ग्लोबल’ अभ्यासक्रम

जाहिरात

 

गारगोटीत 'जिल्हा ग्रंथोत्सव २०२५' चा दिमाखात शुभारंभ; ग्रंथदिंडीने वेधले लक्ष

schedule14 Feb 26 person by visibility 109 categoryसामाजिक

कोल्हापूर :  महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'जिल्हा ग्रंथोत्सव २०२५' ची सुरुवात गारगोटी येथे मोठ्या उत्साहात झाली. ग्रंथदिंडी, मान्यवरांची उपस्थिती आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी या सोहळ्याला विशेष रंगत आणली.

सकाळी ग्रंथदिंडीचे पूजन गारगोटीचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश वास्कर यांच्या हस्ते करण्यात आले. ही भव्य दिंडी ज्योतिर्लिंग देवालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, मुख्य बाजारपेठ, क्रांतीज्योत, ग्रामपंचायत ते इंजूबाईदेवी सांस्कृतिक भवन या मार्गावर काढण्यात आली. या दिंडीमध्ये तालुक्यातील वारकरी संप्रदाय, गारगोटी हायस्कूल, शाहू कुमार भवन आणि गारगोटी प्रशालेचे शेकडो विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. नगरीमध्ये ठिकठिकाणी ग्रंथदिंडीचे उत्स्फूर्त स्वागत व पूजन करण्यात आले.

यानंतर इंजुबाई देवी मंदिरात जिल्हा ग्रंथोत्सवाचे रीतसर उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना डॉ. शिंदे म्हणाले की, आजच्या धावपळीच्या युगात समाजाने मोबाईलला थोडे दूर सारून ग्रंथालये आणि वाचन संस्कृतीकडे आपली पावले वळवली पाहिजेत. याप्रसंगी मौनी विद्यापीठाचे संचालक पी. बी. पाटील आणि बिद्री कारखान्याचे संचालक राहुल देसाई यांनीही वाचन संस्कृतीच्या महत्त्वावर आपली मते व्यक्त केली. उद्घाटन सोहळ्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ स्टॉल्सचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये रणजित आशा अंबाजी यांचा 'फक्त बसायचं आणि मनसोक्त हसायचं' हा एकपात्री विनोदी कार्यक्रम पार पडला. या प्रहसनाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.

या सोहळ्याला भाजप कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, शामराव देसाई, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष मिलिंद पांगिरेकर, मुख्याध्यापक एस. बी. शिंदे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर, तांत्रिक सहाय्यक उत्तम कारंडे, निरीक्षक सदाशिव शिंदे उपस्थित होते. तसेच पांडुरंग कडव, रंगराव तोंडले, रवींद्र कामत, युवराज चौगुले, प्रवीण गुरव, जयसिंग नाईक, बाळासाहेब कवडे, संतोष भोसले, श्रीधर भोईटे, रवींद्र देसाई, दयानंद सरनोबत यांच्यासह जिल्ह्यातील ग्रंथालयाचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांनी केले. राजेंद्र शिंदे व विजय आदित्य यांनी सूत्रसंचालन केले, तर उत्तम कारंडे यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes