"भीमा कृषी प्रदर्शनाच्या शनिवारच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांसह नागरिकांची ,शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची तुफान गर्दी
schedule14 Feb 26 person by visibility 162 categoryराज्य
▪️कागल येथील हैदर भाई फार्म अमेरीकन १८ इंचाचे बोकड, एक टनाचा कानाच्या पुढे वळलेल्या शिंगांचा जाफराबादि सुलतान रेडा,नाचणारा सरकार घोडा,३३ इंचाचा तीन वर्षाचा ७० हजार किंमत असलेला घोडा
▪️११ किलोचा भोपळा १० किलोचा कोहळा सुरण, भीमा कृषी प्रदर्शनात १ किलोचे वांगे एक फुटाचे रताळ, सुळकुड येथील अकरा किलोचा भोपळा, तीन फूट दुधी भोपळा येथील पेरले येथील आदर्श चौगुले यांचा दहा किलो वजनाचा देशी कोहळा,२५ किलोचा वाकरे येथील देशी केळी घड आकर्षण शिरोळ येथील १५ किलो वजनाची हळद गठ्ठा
▪️चंदगड येथील ७५ हजार रुपये किंमतीचे ३५० किलो वजनाचे ब्रीड लार्ज व्हाईट मेल आणि फिमेल(पिग डुक्कर) पन्हाळा येथील ९० किलोचा बोकड भादोले येथील १२० किलो वजनाचा बिटल बोकड,७५० किलो वजनाचा एचएफ अडीच वर्षाचा कागल चिमगाव येथील सचिन लाड यांचा रेडा, साडेसात लाख रुपये किंमत असलेला चॉकलेटी रंगाचा अडीच वर्षाचा एक टन लाल कंधारी बैल प्रदर्शनाचे खास आकर्षण
▪️३५० किलो वजनाचे ब्रीड लार्ज व्हाईट मेल आणि फिमेल(पिग डुक्कर) खास आकर्षण
▪️आज येणार हिंद केसरी हरण्या बैल
▪️दोन दिवस असणाऱ्या भीमा कृषी पशू प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी आवर्जून भेट देण्याचे खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन
▪️भारतातील सर्वात मोठा पाच फुटाचा इग्वाना (सरडा) कृषी प्रदर्शनाचे ठरत आहे खास आकर्षण पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी गर्दी
कोल्हापूर : शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे व शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता याव्यात यासाठी या भव्य कृषी व पशूप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
खासदार धनंजय महाडिक यांनी आयोजित केलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील भव्य अशा "भीमा कृषी व पशू २०२६" प्रदर्शनास शेतकऱ्यांनी आज दुसऱ्या दिवशी शनिवारी मेरी वेदर मैदानावर गर्दी केली होती. दोनशे हून अधिक महिला बचत गटाचे स्टॉल, २५० पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग,अन्य पशुपक्षी विविध, शेतीला लागणारी विविध अवजारे, बी बियाणे, खते, आयुर्वेदिक औषधे यांचा समावेश आहे. खासदार ध १७ वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे भव्य असे भीमा कृषी व पशु पक्षी प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांसह लोकांनी मेरी वेदर मैदानावर तुफान गर्दी झाली आहे.दोन दिवसात उच्चांकी तांदूळाची विक्री झाली आहे.आणि बचत गटाच्या स्टॉलच्या माध्यमातून मोठी विक्री झाली आहे.प्रदर्शन पाहण्यासाठी आणि खाद्य पदार्थांवर ताव मारण्यासाठी कोल्हापूरकर मेरी वेदर मैदानावर गर्दी करत आहेत.
प्रदर्शनात शेतकऱ्यानी पिकविलेला विविध प्रकारचा तांदूळ,
११ किलोचा भोपळा १० किलोचा कोहळा सुरण, भीमा कृषी प्रदर्शनात १ किलोचे वांगे एक फुटाचे रताळ, सुळकुड येथील अकरा किलोचा भोपळा, तीन फूट दुधी भोपळा येथील पेरले येथील आदर्श चौगुले यांचा दहा किलो वजनाचा देशी कोहळा २५ किलोचा वाकरे येथील देशी केळी घड,चंदगड येथील ७५ हजार रुपये किंमतीचे *३५० किलो वजनाचे ब्रीड लार्ज व्हाईट मेल आणि फिमेल(पिग डुक्कर)* पन्हाळा येथील ९० किलोचा बोकड भादोले येथील १२० किलो वजनाचा बिटल बोकड,७५० किलो वजनाचा एचएफ अडीच वर्षाचा कागल चिमगाव येथील सचिन लाड यांचा रेडा, साडेसात लाख रुपये किंमत असलेला चॉकलेटी रंगाचा अडीच वर्षाचा एक टन लाल कंधारी बैल प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे. आजरा दरडेवाडी येथील पाच वर्षाचा सर्जा काळा बैल,दहा महिन्याचा गीर बैल,१४ महिन्याचे ब्ल्यू गोल्ड मकाऊ पोपट (पॅरोट) हरियाणाचा मुरा जातीचा युवराज रेडा,साडेचार वर्षाचा २८ महिन्याचा गडहिंग्लजचा सुलतान रेडा, हसुर बुद्रुक येथील २८ महिन्याचा एक टन वजनाचा मुरहा रेडा, ८०० किलो वजनाचा जाफराराबादी पंढरपूर रेडा, खास आकर्षण आहेत.याचबरोबर चार फूट लांब शिंगाचा पाच वर्षाचा पंढरपुरी जातीचा भैरु रेडा ठरत आहे खास आकर्षण.
कोल्हापूर जिल्ह्यात पिकविण्यात आलेला देशी भाजीपाला,विदेशी भाजीपाला,फुले,जिल्ह्यातील विविध तालुक्यातील कृषी विभागाने तयार केलेली शेतीविषयक डेमो पाहण्याची संधी आदींचा समावेश असून हे प्रदर्शन पाहण्यासाठी व शेती साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी तपोवन मैदानावर तुफान गर्दी केली आहे.याचबरोबर भागीरथी महिला संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांना मोफत झुणका भाकरीचे वाटप करण्यात आले.आज प्रदर्शनस्थळी खासदार धनंजय महाडिक,युथ आयकॉन कृष्णराज महाडिक,सी चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक,भीमा कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक,भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्ष सौ.अरुंधती महाडिक यांनी भेट दिली.
▪️भारतातील सर्वात मोठा अमेरिकन सरडा प्रदर्शनाचे खास आकर्षण
▪️भारतातील सर्वात मोठा अमेरिकन आठ वर्षाचा साडेपाच फुटाचा इग्वाना (सरडा,चार वर्षाचा आणि पाच महिन्याचा सरडा आकर्षण आहे. हे तीन सरडे प्रदर्शनात आणण्यात आला असून हे तीन सरडे प्रदर्शनाचे खास आकर्षण आहेत. पहिल्याच दिवशी सरडा पाहण्यासाठी लोकांनी, शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. प्रदर्शनात आलेला हिरवा सरडा चार महिन्याचा असून त्याची लांबी दोन फूट आहे चार वर्षानंतर तो चार फुटाचा आणि आठ वर्षानंतर तो सहा फुटाचा होतो. यात पाच महिन्याचा सरडा पाव किलो वजनाचा आहे.चार वर्षाचा सरडा चार फुटाचा ९ किलो वजनाचा आहे. तर आठ वर्षाचा सरडा पाच फुटाचा असून त्याचे वजन २२ किलो आहे. हे पूर्ण शाकाहारी असून भोपळा, कोथिंबीर, मेथीची भाजी, आणि अन्य भाजीपाला खातात. दिवसातून दोन वेळा सकाळी दहा वाजता आणि रात्री आठ वाजता त्यांना खाद्य पदार्थ द्यावे कोल्हापूर मधील किशोर वसंत चव्हाण सध्या मुंबईत राहत असून त्यांनी मुंबई येथे हे सरडे लहानपणापासून पाळले आहेत. या सरड्यांना मालकाची बोलीभाषा समजते हे सरडे विषारी नसून ते वर्षातून दोन वेळा ३५ अंडी घालतात. यांचे रक्त थंड असल्याने त्यांना उष्णतेची गरज असते.
▪️अबब खास आकर्षण जनावरे
चंदगड येथील ७५ हजार रुपये किंमतीचे ३५० किलो वजनाचे ब्रीड लार्ज व्हाईट मेल आणि फिमेल(पिग डुक्कर) पन्हाळा येथील ९० किलोचा बोकड भादोले येथील १२० किलो वजनाचा बिटल बोकड,७५० किलो वजनाचा एचएफ अडीच वर्षाचा कागल चिमगाव येथील सचिन लाड यांचा रेडा, साडेसात लाख रुपये किंमत असलेला चॉकलेटी रंगाचा अडीच वर्षाचा एक टन लाल कंधारी बैल प्रदर्शनाचे खास आकर्षण*७५० किलो वजनाचा एचएफ अडीच वर्षाचा कागल चिमगाव येथील सचिन लाड यांचा रेडा, साडेसात लाख रुपये किंमत असलेला चॉकलेटी रंगाचा अडीच वर्षाचा एक टन लाल कंधारी बैल प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे. आजरा दरडेवाडी येथील पाच वर्षाचा सर्जा काळा बैल,दहा महिन्याचा गीर बैल,१४ महिन्याचे ब्ल्यू गोल्ड मकाऊ पोपट (पॅरोट) हरियाणाचा मुरा जातीचा युवराज रेडा,साडेचार वर्षाचा २८ महिन्याचा गडहिंग्लजचा सुलतान रेडा, हसुर बुद्रुक येथील २८ महिन्याचा एक टन वजनाचा मुरहा रेडा, १४७० किलो वजनाचा ४ वर्षाचा गोलू मुरा रेडा,८०० किलो वजनाचा जाफराराबादी पंढरपूर रेडा, खास आकर्षण आहेत.याचबरोबर चार फूट लांब शिंगाचा पाच वर्षाचा पंढरपूर जातीचा भैरु रेडा,राढीवडे राशीवडे बुद्रुक येथील काँकरेज वळू,नरेंद येथील २ वर्षे १ महिना २ दाती स्टूलवर उभा राहणारा मुरा रेडा
▪️देशी विदेशी भाजीपाला,फळे व फुलांचा समावेश
▪️स्थानिक भाज्यासह विदेशी भाजीपाला पहावयास मिळत आहे.भाज्यांमध्ये फळ,वांगी, टोमॅटो, शेंग,मिरची, दुधी भोपळा,मोठा भोपळा, हळद,धान्य, लसूण, शिरोळ कोंडीग्रे येथील हिरवी कारली, शिरोळ कुटवाड येथील काजल काकडी, ऑर्किड फुले, झेंडू फुले, गलांडा, शामली फुले, बालिंगा येथील जरबेरा आदींचा समावेश आहे. तर शंभर रुपये एक ऊस असलेला देशी शिवकालीन काळा ऊस प्रदर्शनात विक्री होत आहे.
तर भाज्यांमध्ये सुळकुड येथील मुलगोंडा पाटील यांचा अकरा किलोचा वजनाचा भोपळ, हालोंडी येथील पाच किलो वजनाचा (पपनस ईडलिंबू), शिरोळ येथील १५ किलो वजनाची हळद गठ्ठा,२५ किलो वजनाचा दहा डझनाचा देशी केळीचा घड, एवढे येथील वळीवडे येथील अर्धा किलोची कांदा पात, भोगमवाडी येथील यांच्या शेतातील एक फुटाचे रताळ, मांजरी गेळा येथील एक किलोचे वांगे, महाकवे येथील दीड किलो वजनाचे रताळ, हुपरी येथील प्रकाश अण्णा माळी यांचा अकरा किलोचा भोपळा, जंगलात उगवणारी रानकेळी प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहेत.*
*धान्य मध्ये नाचणी,इंद्रायणी भात,दौलत जातीची नाचणी, काळा जिरगा,सुवासिक ब्लॅक राईस, काळा वाटाणा,भुईमुग शेंग
▪️प्रदर्शनात अशी आहेत जनावरे,पक्षी
प्रदर्शनामध्ये अमेरिकन शेळ्या, बोकड, असे खास आकर्षण आहेत तर खास सांगोला, दहिवडीवरुन जातिवंत खिल्लार खोंड व खिल्लार गायी सहभागी झाल्या आहेत. परभणी, नांदेड, लातूर येथून लालकंधारी व देवणी, एच एफ जर्शी, साहिवाल, गिर इत्यादी जातीची खोंड, गाई आल्या आहेत, तसेच पंढरपुरी मुह्रा, मेहसाना, जाफराबादी म्हैस, रेडे सहभागी आहेत. तर जातिवंत घोडे, शेळ्या, मेंढ्या, वराह, विविध जातीच्या कोंबड्या तसेच विविध जातीचे पक्षी आले आहेत.शिवाय कागल मधील हैदर अली यांचा ब्रँड ब्रिडिंग फार्म मांडण्यात आली आहे. ज्यात अमेरिकन बेंटम बोकड पांढरे रंगीबेरंगी पक्षी, कबुतरे, ब्लॅक ऍस्ट्रोलॉक कोंबडी, जापनीज बेन्टेस कोंबडी, कडकनाथ चिनी कोंबडी, कोलंबियन ब्रम्हा कोंबडा, पर्शियन मांजर, रनर बदक, मरकवी बदक, घुस, हेडलॉक पांढरे उंदीर, हंगस्टर पक्षी, राजहंस,लवबर्ड,पोपट कागल येथील अमेरीकन १८ इंचाची बिल्टन बोकडे, टर्की कोंबडी बदक व्हाईट पीकॅन बदक, हेमस्टर जातीचे पांढरे उंदीर,हेज टॉग पांढरा उंदीर,
टर्की कोंबडा,प्रदर्शनाचे आकर्षण ठरत आहे. एक टनाचा कानाच्या पुढे वळलेल्या शिंगांचा जाफराबादि सुलतान रेडा आदी जनावरे प्रदर्शनात आली आहेत. ब्ल्यू गोल्ड मकाऊ एक वर्षाचा आहे जो प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहेत.
▪️विविध कंपन्या व उत्पादनांचा सहभाग
या प्रदर्शनामध्ये देश-विदेशातील विविध कृषी साहित्य असणाऱ्या नामांकित कंपन्यांचा सहभाग प्रदर्शनात आहे. यामध्ये प्रॉम्प्ट इक्विपमेंट प्रा. लि., कर्नाटका सोप ॲन्ड डिटर्जंट लि., डेक्कन फार्फ ईक्विपमेंट प्रा. लि, टाटा सोलर, ग्रीन प्लॅनेट बायो प्रॉडक्ट्स, लक्ष्मी पंप्स प्रा. लि., शेरखान लिमिटेड, चितळे उद्योग समूह, राजाराम बापू सहकारी दूध संघ, सावंत ऑरगॅनिक फार्म, डीजे कोकोनट फॉर्म प्रा. लिमिटेड,विविध प्रकारचे मसाले,सावंत यांची विविध उत्पादने,शेतीसाठी लागणारे पंप,अवजारे,ट्रॅक्टर,खोडवा छाटणी यंत्र,आपौषद फवारणी यंत्र, कडबा कुट्टी,पेरणी यंत्र, भांगलणी यंत्र,भात मळणी यंत्र,म्हैस दूध काढणी यंत्र,आणि विविध भरपूर नामांकित कंपन्या प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत. तसेच कोल्हापूर ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन यांनी देखील या प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध कंपन्यांची उत्पादने पाहावयास व खरेदी करता येत आहेत.शेतीची अवजारे, खते औषधे,आदी कंपन्या सहभागी झाल्या आहेत.शिवाय शेतीची नवीन माहिती व अन्य नवनवीन औजारे पहावयास मिळत आहेत.खरेदी केली जात आहे.
प्रदर्शनात तांदूळ महोत्सव अंतर्गत विविध प्रकारचा तांदूळ उपलब्ध करण्यात आला आहे. यामध्ये आजरा घनसाळ, रत्नागिरी चोवीस, भोगावती, इंद्रायणी तसेच बाजरी, नाचणी, संद्रिय गुळ, हळद आदींची उपलब्धता करण्यात आली आहे.ज्याची दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात विक्री ही झाली आहे.विविध प्रकारचा स्थानिक आणि विदेशी भाजीपाला, ऊस, बी-बियाणे पाहावयास मिळत आहे. तरी शेतकऱ्यासाठी परिपूर्ण असणारे हे भीमा कृषी व पशू प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांसह नागरिकांनी भेट द्यावी असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.
भागीरथी महिला संस्थेच्या वतीने मा. सौ. अरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना दरवर्षी भिमा कृषी प्रदर्शनात संधी मिळते,यावर्षीही दोनशे बचत गट आपली विविध प्रकारची उत्पादने या स्टॉलद्वारे लावली आहेत. महिलांनी बनविलेल्या उत्पादनाला भिमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून थेट बाजारपेठ मिळवून दिली गेली आहे.ज्यात महिला कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा,थालीपीठ,वडा कोंबडा,चिकन ६५,दम बिर्याणी,चिकन बिर्याणी,मसाले भात वेगवेगळी थाळी आणि विविध खाद्य पदार्थ विक्री केली जात आहे.खाद्य महोत्सव अंतर्गत विविध खाद्य पदार्थांवर शेतकरी व नागरिक ताव मारत आहेत.
याचबरोबर प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना तज्ञ व्यक्तींकडून शेतीविषयक माहिती दिली जात आहे आणि वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ज्याद्वारे स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळत आहे. आज गंध महाराष्ट्राचा हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.तर उद्या १५ फेब्रुवारी रोजी नृत्य मल्हार हा कार्यक्रम होणार आहे.
▪️प्रदर्शनात आज झालेली व्याख्याने
प्रदर्शनामध्ये आज क्षारपड जमिनीची एकात्मिक सुधारणा नवी दिशा या विषयावर प्रा.डॉ. संग्राम धर्माजी काळे यांनी बोलताना जमीन खराब होण्याची कारणे तसेच क्षारयुक्त जमिनी, क्षारयुक्त चोपन जमीनि व चोपण जमिनी याचा पीक उत्पादनावर होणारा परिणाम व उपाय यावर सखोल मार्गदर्शन केले. यामध्ये हिरवळीच्या खतांचा वापर विविध भू सुधारकांचा वापर तसेच जैविक खतांचा वापर व वरील जमिनीसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी सखोल मार्गदर्शन केले. प्राध्यापक, मृदा, शास्त्र ,कृषी संशोधन केंद्र, कसबा डिग्रज, जि.सांगली यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणार आहे. आणि आंबा लागवड व काढणी पश्चात तंत्रज्ञान या विषयावर डॉ. केशव हरी पुजारी माजी प्रमुख फलोद्यान सहयोगी अधिष्ठाता यांनी आंबा लागवड कशी करावी त्याची निगा कशी राखावी,आंबा मोहर येत असताना कोणती काळजी घ्यावी आणि आंबा लागेपर्यंत काय करावे याविषयी मार्गदर्शन केले.
याचबरोबर प्रति हेक्टर ४०० ते ५०० आंबा झाडे लावून कमीत कमी जागेत जास्त उत्पन्न मिळू शकते. अडीच ते पाच टन उत्पन्नासाठी खतांचा वापर योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे.यात पालापाचोळा शेणखत याचा वापर करायचा आहे अशी माहिती दिली. आंब्याच्या एकूण १५०० जाती आहेत. मात्र त्यातील केवळ वीस जाती व्यावसायिक आहेत असे सांगितले त्या वेगवेगळ्या ठिकाणी पिकविल्या जातात त्याची माहिती दिली.याचबरोबर त्यांनी आंबा लागवडीनंतरचे व्यवस्थापन या विषयावरही मार्गदर्शन केले.
▪️उद्या होणारी व्याख्याने
रविवारी १५ फेब्रुवारी रोजी प्रा.ऋतुराज सयाजीराव चव्हाण तज्ञ व तांत्रिक सल्लागार हे सेंद्रिय शेतीसाठी अचूक निविष्ठांचा वापर काळाची गरज विषयावर विचार मांडणार आहेत. डॉ. श्री. सॅम लुद्रिक (पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र शासन) हे दुधाळ जनावरांची निगा व संगोपन या विषयावर विचार व्यक्त करणार आहेत.
▪️कृषी विभागाची माहिती
महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्माच्या वतीने शेती उपयुक्त डेमो या ठिकाणी सादर करण्यात आले आहेत.ज्यामध्ये सुपर केन नर्सरी, क्षारपड जमीन सुधारणा मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण, आत्माच्या वतीने राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान या अंतर्गत योजनेची उद्दिष्टे योजना काय आहे याचा प्रकल्प या ठिकाणी सादर करण्यात आला आहे. गोशाळा कशी असावी याची प्रात्यक्षिक दाखविण्यात आले आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या अंतर्गत ठिबक सिंचन, आंबा लागवड,गांडूळ युनिट दाखविण्यात आले आहेत. त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, कीटकनाशके फवारताना काय करू नये याबाबत माहिती देण्यात आली आहे. शासनाच्या विविध योजना यामध्ये महाडीबीटी अर्ज एक योजना अनेक काय आहेत हे मांडण्यात आले आहे. त्याचबरोबर मातीचा नमुना कसा घ्यावा अन्नपौष्टिक तृणधान्य याबाबत माहिती मांडण्यात आली आहे.ड्रोन माध्यमातून शेती कशी करावी याचीही माहिती दिली जात आहे.कीटकनाशके फवारताना कामगंध सापळा पक्षी थांबे रोपांत द्वारे ऊस लागवड, पौष्टिक तृणधान्याच्या पासून तसेच प्रदर्शनात पाचट व्यवस्थापन ए आय तंत्रज्ञानचा वापर करून स्मार्ट शेती उपयोग, ड्रोनद्वारे फवारणी सेंसरचा वापर कृत्रिम रेतन ए.आय किटचा वापर याबाबत प्रदर्शनात मार्गदर्शन होत आहे.
▪️विशेष सहकार्य असणाऱ्या वृंदावन फाउंडेशनविषयी
वृंदावन फाउंडेशनमार्फत महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न, ग्रामीण भागातील गरीब होतकरू शेतकन्यांकरीता अवजारे खरेदी करणेसाठी प्रयत्न व मदत, गरीब व होतकरू नवीन तरुण उद्योजकांसाठी व्यवसायासाठी प्रयत्न व मदत, भटक्या जनावरांसाठी अन्नदान व उपचार करीता प्रयत्न व मदत, अनाथ मुलांसाठी शिक्षणाकरिता मदत, ग्रामीण विकासासाठी प्रयत्न, सांस्कृतीक व आर्थिक विकास, स्वयंसेवी संस्थाना मदत, पर्यावरण प्रयत्न, समाजातील वंचित घटकांना उच्चाटनासाठी विविध कार्यक्रम राबवणे, आरोग्यविषयक सुवीधा पुरवणे तसेच शिबिरे आयोजीत करणे असे विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. वृंदावन फाउंडेशनची याच वर्षी नोंदणी झाली आहे. अशी माहिती वृंदावन फाउंडेशनच्या संचालिका सौ. गौरी सुजित चव्हाण व संचालिका जाई संजय भोसले यांच्या वतीने सुजित चव्हाण यांनी दिली.
प्रदर्शनाचे २०२६ हे १८ वे वर्ष असून या प्रदर्शनामध्ये शेतकरी ते ग्राहक असा थेट विक्री होणारा तांदूळ महोत्सव, धान्य महोत्सव, २५० पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग, १५० पेक्षा अधिक पशु-पक्षांचा सहभाग, शेती विषयक तज्ञांचे मार्गदर्शन व चर्चासत्र, विविध शेती अवजारे, बी-बीयाणे खते आदींची माहिती, फुलांचे प्रदर्शन व विक्री (पुष्पप्रदर्शन) विविध बचत गटांचे मोफत स्टॉल,
यावर्षीच्या भिमा कृषी प्रदर्शनास कृषी विभाग व किसान कल्याण मंत्रालय, कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, पशुसवर्धन विभाग, आत्मा, जिल्हा परिषद कोल्हापूर, वृंदावन फाउंडेशन आणि कोल्हापूर ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. प्रदर्शन दोन दिवस सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे.याचबरोबर लाईव्ह डेमॉस्ट्रेशन पहाण्यास मिळत आहे.
चार दिवस आयोजित करण्यात आलेल्या या कृषी व पशू प्रदर्शनाचा कोल्हापूर तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.
प्रदर्शनासाठी या प्रदर्शनासाठी प्रा. जे.पी.पाटील, डॉ. अजित शिंदे, डॉ.सुनील काटकर, सर्जेराव धनवडे, दादा, अशोक सिधनेर्ले,दिलीप दळवी,सुजित चव्हाण ,किरण रणदिवे,प्रमोद खोपडे,सचिन पाटील कृषी विभागाची टीम आदी परिश्रम घेत आहेत.
आत्माच्या वतीने शेतकरी गट कंपन्यांची माहिती दिली जात आहे शिवाय प्रदर्शनामध्ये तांदूळ महोत्सव हेही आकर्षण आहे. ज्यामध्ये आजरा घनसाळ, रत्नागिरी २४,भोगावती, इंद्रायणी आदि नमुनांचे तांदूळ आहे आज पहिल्याच दिवशी तांदळाची तसेच नाचणी सेंद्रिय गूळ,हळद यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली.
विविध प्रकारचा स्थानिक आणि विदेशी भाजीपाला, ऊस, बी - बियाणे पाहाव्यास मिळत आहेत.
याचबरोबर प्रदर्शनामध्ये लाल कंधारी गाई, पंढरपूर मधील गायी, संकरित गायी म्हैशी, वैशिष्ट्यपूर्ण वेगवेगळ्या जातीचे घोडे, विविध जनावरांच्या जाती पहावयास मिळत आहेत. आज सायंकाळी प्रदर्शन स्थळी प्रचंड गर्दी लोकांनी,शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी केली होती.आता दोन दिवस प्रदर्शन उरले असून शेतकऱ्यांनी भेट देण्याचे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.
प्रदर्शनास हाऊस ऑफ इव्हेंट, असोसिएशन संस्थेने कृषी प्रदर्शनाला सहकार्य केले आहे. व आपला सहभाग नोंदवला आहे. कृषी व किसन कल्याण मंत्रालय,शेती विभाग महाराष्ट्र राज्य, पशुसवर्धन विभाग,आत्मा, जिल्हा परिषद कोल्हापूर,एचसीपीएसी यांचे सहकार्य लाभले आहे. प्रदर्शन अजून दोन दिवस सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे.याचबरोबर लाईव्ह डेमिस्ट्रेशन पहाण्यास मिळत आहे.
भीमा कृषि प्रदर्शनात धान्य महोत्सव दालनात दोन दिवसात विक्री झालेला शेतमाल :
१) सेंद्रीय गूळ : एक किलोचे एक हजार रवे
२) इंद्रायणी तांदूळ : ३२०० kg
३) आजरा घनसाळ : २१०० kg
४) इंद्रायणी कणी : १५०० kg
५) रत्नागिरी २४ : ४००० kg
६) सेंद्रीय हळद : ५०० kg
७) नाचणी : ८०० kg
८)हात सडीचा काळा तांदूळ १००० kg