SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
"भीमा कृषी प्रदर्शनाच्या शनिवारच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांसह नागरिकांची ,शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची तुफान गर्दीगारगोटीत 'जिल्हा ग्रंथोत्सव २०२५' चा दिमाखात शुभारंभ; ग्रंथदिंडीने वेधले लक्षकृषी प्रदर्शन-कराओके गायन स्पर्धा : आदिती भराडे, वसिम मुजावर यांनी पटकावला प्रथम क्रमांकअतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांची घोडावत विद्यापीठाला सदिच्छा भेटभिमा कृषी प्रदर्शनात भागीरथी महिला संस्थेच्यावतीने मोफत झुणका-भाकरी वाटपमहाविकास आघाडीच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांचा सोमवारी सत्कारदक्षिण-पश्चिम विभागीय युवा महोत्सवात शिवाजी विद्यापीठ संघाचे घवघवीत यशभाजपच्या जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांचा उद्या रविवारी सत्कारशाश्वत विकासासाठी संशोधन ही रसायनशास्त्राची सामाजिक, नैतिक जबाबदारी: डॉ. इंद्रजीत घोष; शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र परिषदडी. वाय. पाटील कृषी विद्यापीठात लवकरच ‘एमबीए ग्लोबल’ अभ्यासक्रम

जाहिरात

 

अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांची घोडावत विद्यापीठाला सदिच्छा भेट

schedule14 Feb 26 person by visibility 100 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाचे महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांनी संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर येथे सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यापीठातील शैक्षणिक, संशोधन व कौशल्यविकास उपक्रमांचा त्यांनी आढावा घेतला. 
विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष संजय घोडावत यांनी खारगे यांचे स्वागत केले. यावेळी विद्यापीठातील अत्याधुनिक प्रयोगशाळा, संशोधन केंद्रे, स्टार्टअप इन्क्युबेशन सेल तसेच विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रमांची त्यांना माहिती देण्यात आली. यावेळी खारगे यांनी परदेशी विद्यापीठातील तज्ञ प्राध्यापकांना मार्गदर्शनसाठी आमंत्रित करून संशोधन क्षेत्रात अधिक कार्य करण्याची सूचना केली. 

तसेच विद्यापीठातील उद्योगसहभाग, नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या विद्यापीठाच्या प्रयत्नांना त्यांनी प्रशंसनीय म्हटले. राज्याच्या शैक्षणिक प्रगतीत अशा खाजगी विद्यापीठांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.

 स्पर्धात्मक युगात कौशल्यविकास, संशोधनवृत्ती आणि नैतिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. “ज्ञान, कौशल्य आणि चारित्र्य यांचा संगम साधणारे विद्यार्थीच देशाच्या प्रगतीचे खरे शिल्पकार ठरतात,” असे प्रतिपादन त्यांनी केले. या
भेटी दरम्यान घोडावत विद्यापीठाचे  ट्रस्टी व गव्हर्निंग कौन्सिल मेंबर विनायक भोसले, राकेश घोडावत, राजेश घोडावत, नवीन पाटील, रवी चौधरी हे ही उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes