स्वर्गीय वसंतदादा पाटील यांना ‘गोकुळ’तर्फे अभिवादन
schedule13 Nov 25 person by visibility 57 categoryउद्योग
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सहकार चळवळीचे प्रणेते स्वर्गीय वसंतदादा पाटील यांची १०८ वी जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ व संचालक मंडळ यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, गोकुळ दूध संघाच्या जडणघडणीत आणि विकासामध्ये स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे योगदान अतिशय मोलाचे आहे. त्यांच्या सहकार तत्त्वज्ञानामुळेच गोकुळ संघाने आज महाराष्ट्रातील तसेच देशातील आघाडीचे स्थान प्राप्त केले आहे. वसंतदादांनी दाखविलेल्या सहकार मार्गावर गोकुळची वाटचाल चालू असल्याचे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.एम.पी.पाटील यांनी केले.
याप्रसंगी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, संभाजी पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.