कोल्हापुरात मंगळवारी 'कै. रामचंद्र कबनूरकर स्मृती' भव्य खुली एकदिवसीय बुद्धिबळ स्पर्धा
schedule17 Nov 26 person by visibility 120 categoryक्रीडा
कोल्हापूर : कै. रामचंद्र दत्तात्रय कबनूरकर यांच्या स्मरणार्थ शंतनु शरद कबनूरकर व सर्वेश शरद कबनूरकर यांच्या मार्फत आणि अनुज् चेस ॲकॅडमी यांच्या वतीने मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता भव्य खुल्या एकदिवसीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा श्री हरी बाळकृष्ण हवेली ट्रस्ट, कलेक्टर ऑफिस चौक, कोल्हापूर येथे पार पडणार आहे.
या स्पर्धेसाठी शंतनु शरद कबनूरकर व सर्वेश शरद कबनूरकर यांचेकडून एकूण २२,७०० रुपयांची रोख पारितोषिके, तसेच एकूण १५ ट्रॉफी, १५ मेडल आणि उत्तेजनार्थ ५ ट्रॉफी व ५ मेडल ठेवण्यात आली आहेत.
◼️स्पर्धेतील गट व बक्षिसांची रचना खालीलप्रमाणे आहे :
▪️खुला गट (ओपन) : प्रथम क्रमांक ₹३,००० व ट्रॉफी, द्वितीय ₹२,००० व ट्रॉफी, तृतीय ₹१,००० व ट्रॉफी, चौथा ₹८००, पाचवा ₹७००, सहावा ₹६००, सात ते नऊ क्रमांक प्रत्येकी ₹५०० आणि दहावा क्रमांक (महिलांसाठी) ₹५००.
▪️१५ वर्षांखालील गट (१/१/२०११ च्या नंतर जन्म) : प्रथम क्रमांक ₹२,००० व ट्रॉफी, द्वितीय ₹१,००० व ट्रॉफी, तृतीय ₹७०० व ट्रॉफी, चौथा (मुलींसाठी) ₹४०० व ट्रॉफी, पाच ते सात क्रमांक ₹४०० आणि आठ ते दहा क्रमांक मेडल.
▪️१२ वर्षांखालील गट (१/१/२०१४ च्या नंतर जन्म) : प्रथम क्रमांक ₹१,००० व ट्रॉफी, द्वितीय ₹५०० व ट्रॉफी, तृतीय ₹४०० व ट्रॉफी, चौथा (मुलींसाठी) ₹४०० व ट्रॉफी आणि पाच ते दहा क्रमांक मेडल.
▪️९ वर्षांखालील गट (१/१/२०१७ च्या नंतर जन्म) : प्रथम क्रमांक ₹१,००० व ट्रॉफी, द्वितीय ₹५०० व ट्रॉफी, तृतीय ₹४०० व ट्रॉफी, चौथा (मुलींसाठी) ₹४०० व ट्रॉफी आणि पाच ते दहा क्रमांक मेडल.
▪️विशेष गट पारितोषिके : ज्येष्ठ नागरिक (५०+), ज्येष्ठ महिला (१८+) आणि अपंग गटासाठी स्वतंत्र प्रथम क्रमांक ₹५०० व द्वितीय क्रमांक ₹४०० अशी बक्षिसे दिली जातील.
स्पर्धेची प्रवेश फी ₹३५०/- असून नाव नोंदणीची अंतिम तारीख सोमवार, दि. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजेपर्यंत आहे. त्यानंतर येणाऱ्या स्पर्धकांना ₹५० लेट फी आकारली जाईल.
स्पर्धा आंतरराष्ट्रीय नियमांनुसार स्विस लीग (साखळी) पद्धतीने आणि प्रत्येकी १०.०५ मिनिटांच्या क्लॉक टाइमिंगनुसार खेळवली जाईल.
सकाळी ९ वाजता उद्घाटन होऊन लगेच पहिली फेरी सुरू होईल आणि सायंकाळी पारितोषिक वितरण समारंभ पार पडेल.
आयोजकांकडून सर्व स्पर्धकांना दुपारचे जेवण दिले जाणार आहे.
स्पर्धेचे चीफ आर्बिटर म्हणून शैलेश होनकट्टी काम पाहणार आहेत. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संयोजक समितीचे अध्यक्ष कृष्णात पाटील, आयोजक शशिकांत कबनूरकर तसेच सदस्य सुर्यकांत चोडणकर, सर्वेश सुतार व अनुष्का पाटील परिश्रम घेत आहेत. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी अनुज पाटील (९५२९०५२००३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.