SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिरोली-किणी या मार्गावरील अपघातांचे ऑडिट करण्यात यावे : अपर जिल्हाधिकारी अजय पवारप्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरूसाके येथे शोकाकुल पाटील कुटुंबीयांची पूनम तोडकर यांनी घेतली सांत्वनपर भेटकोल्हापूर महानगरपालिका कारभारावर 'आप'चा संताप: नगरसेवकांकडे प्रशासनाला गतिमान करण्याचे कौशल्य नाही : अभिजीत कांबळेकळंब्यात व्यावसायिक गाळ्यांचे उद्घाटन; ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात भररिंगरोडच्या दर्जेदार विकासासाठी दीड कोटींचा निधी लवकरच मिळणार: नगरसेवक अभिजित खतकर यांची माहितीतात्यासाहेब कोरे पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालय वेगळेपणा जपेल : डॉ. विनय कोरेडी. वाय. पाटील साळोखेनगरचा ‘टेस्ट ग्रँड सोल्युशन्स’शी सामंजस्य करारराष्ट्रीय प्रेस दिन: लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि वृत्तपत्रांची जबाबदारीकोल्हापुरात राज्यातील पहिला ‘महा-पल्स एआय’ आरोग्य प्रकल्प; १०४ शासकीय आरोग्य संस्था होणार डिजिटल यंत्रणेशी जोडल्या जाणार!

जाहिरात

 

शिरोली-किणी या मार्गावरील अपघातांचे ऑडिट करण्यात यावे : अपर जिल्हाधिकारी अजय पवार

schedule16 Nov 26 person by visibility 121 categoryगुन्हे

कोल्हापूर :  जिल्ह्यातील राष्ट्रीय, राज्य आणि प्रमुख महामार्गावरील दोन्ही बाजूची अतिक्रमणे संबंधित यंत्रणांनी काढावीत. तसेच सर्वाधिक अपघातग्रस्त असणाऱ्या शिरोली-किणी मार्गावरील अपघाताचे ऑडिट करण्यात यावे, अशी अपेक्षा अपर जिल्हाधिकारी अजय पवार यांनी व्यक्त केली.

अपर जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

ते म्हणाले, रस्ते अपघातामुळे अनेकांवर मृत्यू ओढावू शकतो. याचे प्रमाण कमी करणे संपूर्णता मानवी हातात आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी अतिशय काळजीपूर्वक या कामाला प्राधान्य द्यावे .

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय तसेच केंद्र सरकारच्या सेव्हलाईफ फाऊंडेशनच्या सहकार्याने देशभरातील शंभर जिल्ह्यामध्ये 'झिरो फॅटलिटी डिस्ट्रीक' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये कोल्हापूरचाही समावेश आहे.

 या जिल्ह्यातून राष्ट्रीय,राज्य आणि प्रमुख महामार्ग जातात. पोलीस प्रशासनाकडून जिल्ह्यात 52 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चिती करण्यात आली आहे. ही सर्व ब्लॅक स्पॉट लवकरात लवकर दुरुस्त करावीत. जिल्ह्यातील सर्व महामार्गावरील खड्डे भरणे, रोड मार्किंग करणे, डिव्हायडर संदर्भात फलक लावणे, सिग्नल दुरुस्ती, चौकात पट्टे मारणे, झाडांच्या फांद्या कट करणे, राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील अतिक्रमणे काढणे त्याचबरोबर रोड लगतच्या साइड पट्टया भरुन घेणे आदी कामे संबंधित विभागाने वेळेत करावीत असे निर्देशही त्यांनी या बैठकीत दिले.

 राहवीर योजनेची माहिती सर्व पोलीस स्टेशनमध्ये दर्शनी भागात लावावी तसेच या योजनेला व्यापक प्रसिध्दी मिळावी, अशी सूचना अशासकीय सदस्य विनायक रेवणकर यांनी या बैठकीत केली .

  नॅशनल हायवेचे कार्यकारी अभियंता महेश पाटोळे, पीडब्ल्यूडीचे क्रांतीकुमार मिरजकर, कार्य.अभियंता डी. आर. भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज ओतारी, इचलकरंजी आरटीओ श्रीकृष्ण नकाते, पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्यासह संबंधित विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes