SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिरोली-किणी या मार्गावरील अपघातांचे ऑडिट करण्यात यावे : अपर जिल्हाधिकारी अजय पवारप्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरूसाके येथे शोकाकुल पाटील कुटुंबीयांची पूनम तोडकर यांनी घेतली सांत्वनपर भेटकोल्हापूर महानगरपालिका कारभारावर 'आप'चा संताप: नगरसेवकांकडे प्रशासनाला गतिमान करण्याचे कौशल्य नाही : अभिजीत कांबळेकळंब्यात व्यावसायिक गाळ्यांचे उद्घाटन; ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात भररिंगरोडच्या दर्जेदार विकासासाठी दीड कोटींचा निधी लवकरच मिळणार: नगरसेवक अभिजित खतकर यांची माहितीतात्यासाहेब कोरे पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालय वेगळेपणा जपेल : डॉ. विनय कोरेडी. वाय. पाटील साळोखेनगरचा ‘टेस्ट ग्रँड सोल्युशन्स’शी सामंजस्य करारराष्ट्रीय प्रेस दिन: लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि वृत्तपत्रांची जबाबदारीकोल्हापुरात राज्यातील पहिला ‘महा-पल्स एआय’ आरोग्य प्रकल्प; १०४ शासकीय आरोग्य संस्था होणार डिजिटल यंत्रणेशी जोडल्या जाणार!

जाहिरात

 

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

schedule16 Nov 26 person by visibility 122 categoryराज्य

◼️पात्र युवकांना मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी; दरमहा ९ हजार रुपये विद्यावेतन

कोल्हापूर : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत देशातील १८ ते २५ वर्षे वयोगटातील एक लाखाहून अधिक तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इंटर्नशिपचा कालावधी ६ ते ९ महिने असून, प्रशिक्षणार्थींना दरमहा ९ हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. या योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी इच्छुक उमेदवारांनी http://pminternship.mca.gov.in या अधिकृत पोर्टलवर आपले प्रोफाईल तयार करून विविध क्षेत्रांतील उपलब्ध इंटर्नशिपसाठी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले आहे.

तिसऱ्या फेरीअंतर्गत बजाज जनरल इन्शुरन्स लिमिटेड या कंपनीमध्ये सेल्स अँड मार्केटिंग क्षेत्रासाठी २५ इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध आहेत. यासाठी पदवीधर उमेदवार पात्र असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे.

उमेदवारांना अर्जाच्या अंतिम मुदतीपर्यंत जास्तीत जास्त तीन इंटर्नशिपसाठी अर्ज करता येणार आहेत. या योजनेअंतर्गत प्रत्येक प्रशिक्षणार्थीला भारत सरकारतर्फे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत विमा संरक्षण देण्यात येते. याशिवाय संबंधित कंपनीकडून अतिरिक्त अपघात विमा संरक्षणही प्रदान केले जाते.

अर्जासाठी उमेदवारांकडे दहावी, बारावी व पदवीचे गुणपत्रक, आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे. योजनेची अधिक माहिती व अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शनासाठी इच्छुक उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर येथे दूरध्वनी क्रमांक ०२३१-२५४५६७७ वर संपर्क साधावा.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes