SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात काँग्रेस मंगळवार, बुधवारी घेणार इच्छुकांच्या मुलाखतीकोल्हापूर महानगरपालिका : उल्लेखनीय काम केलेल्या 54 कर्मचाऱ्यांचा सत्कारशिष्यवृत्ती परीक्षा राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या 10 विद्यार्थ्यांचा सत्कारकोल्हापूर महापालिकेच्या 53 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणबुद्धिबळ स्पर्धेत ऋषिकेश कबनुरकर अजिंक्यमहापालिका निवडणूक महायुती एकत्रच लढणार, जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ राहणार, खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वासराज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर, १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकालमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सी.पी.टी.पी. २०११ बॅच प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची ‘गोकुळ’ दूध संघाला अभ्यास भेटइचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये विक्रमी उत्साह : शेकडो इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उत्साहात

जाहिरात

 

शिष्यवृत्ती परीक्षा राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या 10 विद्यार्थ्यांचा सत्कार

schedule15 Dec 25 person by visibility 81 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या सन 2024-25 शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा महापालिकेच्या 53 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात करण्यात आला. हा सत्कार कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात करण्यात आला.

  यामध्ये जरननगर विद्यालयातील विद्यार्थी स्वरा पाटील (राज्यात पाचवी), अव्दैत पोवार (राज्यात पाचवा), संस्कार पाटील, (राज्यात सहावा), मधुरिमा जाधव (राज्यात सहावी), उत्कर्ष खानोलकर (राज्यात आकरावा), काव्या घोटणे (राज्यात बारावी), विराज पवार (राज्यात बारावा), पीएमश्री महात्मा फुले विद्यालयातील विद्यार्थी रौनक वाईंगडे (राज्यात नववा), ज्ञानदा चौगले (राज्यात चौदावी) यांचा समावेश आहे.

  त्याचप्रमाणे महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने महापालिकेच्या शाळेतील 41 विद्यार्थींनीना मोफत गणवेश देण्यात आला. तसेच महापालिकेच्या 53 व्या वर्धापन दिनानिमित्त कर्मचा-यांना 800 अल्पोहराचे वाटप करण्यात आले.

 यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहा.आयुक्त उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, कृष्णा पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजश्री पाटील, शहर अभिंयता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, प्रशासन अधिकारी डी.सी.कुंभार, नगरसचिव सुनील बिद्रे, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चलावाड, उपशहर रचनाकार एन.एस.पाटील, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर, निवास पोवार, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, कामगार अधिकारी राम काटकर, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबरे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, रचना व कार्यपध्दती अधिकारी प्रशांत पंडत, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes