SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महानगरपालिका : उल्लेखनीय काम केलेल्या 54 कर्मचाऱ्यांचा सत्कारशिष्यवृत्ती परीक्षा राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या 10 विद्यार्थ्यांचा सत्कारकोल्हापूर महापालिकेच्या 53 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणबुद्धिबळ स्पर्धेत ऋषिकेश कबनुरकर अजिंक्यमहापालिका निवडणूक महायुती एकत्रच लढणार, जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ राहणार, खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वासराज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर, १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकालमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सी.पी.टी.पी. २०११ बॅच प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची ‘गोकुळ’ दूध संघाला अभ्यास भेटइचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये विक्रमी उत्साह : शेकडो इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उत्साहात सामान्य ग्राहकांना प्रीपेड मीटर नाहीत; स्मार्ट मीटरमुळे वीजबिलात लाभ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जाहिरात

 

बुद्धिबळ स्पर्धेत ऋषिकेश कबनुरकर अजिंक्य

schedule15 Dec 25 person by visibility 167 categoryक्रीडा

कोल्हापूर  : बेळगाव, शास्त्रीनगर गुजरात भवन येथे रविवार 14 डिसेंबर रोजी झालेल्या फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा २०२५ या स्पर्धेत ऋषिकेश कबनुरकर याने ९ व्या फेरीत ८ गुण मिळवून पहिला क्रमांक घेत २१००० रुपये आणि चषक पटकविला. वेकेटेश खाडे -पाटील याने ८ गुण मिळवून ३ रा क्रमांक  मिळाला.  त्याला १०,००० रुपये पारितोषिक आणि चषक देऊन गौरव करण्यात आला.अशुमन निखिल शेवडे ६ गुण मिळवून अंडर ११गटात पारितोषिक मिळाले 

एआयसीएएफ आणि केएससीए यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने गिरिस्तुती चेकमेट स्कूल ऑफ चेस तर्फे १८ वर्षांखालील मुलांसाठी फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा २०२५  आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये एकूण १००००० रुपयाची पारितोषिके होती. देशातील २७८खेळाडूनी भाग घेतला त्या मध्ये १०२ फिडे मानांकित खेळाडू होते.

ऋषिकेश हा अनुज अकॅडमी, दाभोळकर कॉर्नर, ताराबाई पार्क येथे  सराव करतो. तो स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे.  त्याला कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, सचिव शुभांगी गावडे, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे, प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, ज्युनिअर जिमखाना विभाग प्रमुख प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे,  कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन माजी सेक्रेटरी कृष्णात पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

वेकेटेश खाडे पाटील हाही अनुज चेस अकॅडमीचा विद्यार्थी आहे तो प्रायव्हेट येथे शिक्षण घेत आहे .

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes