कोल्हापूर महापालिकेच्या 53 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण
schedule15 Dec 25 person by visibility 68 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या 53 व्या वर्धापन दिनानिमित्त महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी बोलताना महापालिकेच्या 53 व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा दिल्या. महापालिकेत काम करताना उल्लेखनीय काम केलेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करुन कोल्हापूर महापालिका हि आपणा सर्वांची आहे. महापालिकेमध्ये उत्कृष्ठ काम करणा-या प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान प्रत्येक वर्षी वर्धापन दिनाचे औचित्य साधून करण्यात येणार आहे. यावर्षी एक वेगळे असा उपक्रम म्हणून सर्वांसाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले आहे. महापालिकेचे अधिकारी कर्मचाऱ्यांचे आरोग्य खूप महत्वाचे आहे. आपण सर्वजण तणावाखाली काम करता, म्हणून आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात येत असल्याचे सांगितले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहा.आयुक्त उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, कृष्णा पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजश्री पाटील, शहर अभिंयता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, प्रशासन अधिकारी डी.सी.कुंभार, नगरसचिव सुनील बिद्रे, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चलावाड, उपशहर रचनाकार एन.एस.पाटील, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर, निवास पोवार, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, कामगार अधिकारी राम काटकर, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबरे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, रचना व कार्यपध्दती अधिकारी प्रशांत पंडत, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.





