राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर, १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
schedule15 Dec 25 person by visibility 104 category
मुंबई : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकींची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील २९ महानगर पालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १५ जानेवारीला सर्व महापालिकांसांठी मतदान पार पडणार आहे, तर १६ जानेवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे.
राज्यातील २९ महानगरपालिका क्षेत्रात आजपासून निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे.
▪️निवडणूक कार्यक्रम
- नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी - २३ ते ३० डिसेंबर
- नामनिर्देशन पत्र छाननी ३१ डिसेंबर २०२५
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २ जानेवारी २०२६
- निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी - ३ जानेवारी २०२६
- मतदान १५ जानेवारी २०२६ रोजी
- निवडणूक निकाल १६ जानेवारी २०२६ रोजी





