SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोरे अभियांत्रिकीतील ई अँड टी सी विभागाचे सलग सहाव्या वर्षी १०० टक्के प्लेसमेंटदेवेंद्र फडणवीस यांच्याकडून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्याची सीमावासियांना मोठी अपेक्षा..." शिक्षण प्रक्रियेत ताण-तणाव व्यवस्थापन शिक्षणाची गरज."कुरुंदवाड येथील "उदय भाऊ किंग" टोळी एक वर्षासाठी कोल्हापूर जिल्हयातुन हद्दपार !!पुणे विभागातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा तर कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारातंत्रज्ञान अधिविभागात अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन सेमिनारला प्रतिसादकोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी व्यापक बैठकीचे पालकमंत्र्याकडून ठोस आश्वासनमेन‌ राजाराम प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घेतला योगासनाचा प्रात्यक्षिक अनुभवडी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाकडून उत्कर्ष आवळेकर, योगेश चिमटे यांना पीएच.डी.स्थानिक स्वराज संस्थांमध्ये माझी वसुंधरा अभियान ६.0 राबविणार : पंकजा मुंडे

जाहिरात

 

मेन‌ राजाराम प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घेतला योगासनाचा प्रात्यक्षिक अनुभव

schedule21 Jun 25 person by visibility 212 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : समृद्ध शैक्षणिक इतिहासाचे सोनेरी पान असणाऱ्या जिल्हा परिषद संचलित मेन‌ राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घेतला विविध योगासनाचा प्रात्यक्षिक अनुभव.

'एक पृथ्वी एक आरोग्य यासाठी योग' या ब्रीदवाक्याने साजरा होणाऱ्या ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्रशालेतील ऐतिहासिक सभागृहामध्ये प्राचार्य डॉ. गजानन खाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या समारंभात उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांनी प्रात्यक्षिकातून योगासनाचा अनुभव यावेळी घेतला. आर्ट ऑफ लिव्हिंगचे वरिष्ठ शिक्षक अजय किल्लेदार व योगशिक्षिका शिवानी पाटगांवकर यांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली योगसाधना समारंभ उत्साहात संपन्न झाला. 

योगासनांमुळे केवळ शरीराचं नाही, तर मनाचंही स्वास्थ्य सुधारतं. त्याचं महत्त्व भारतामुळे सगळ्या जगाला समजलं आहे. अभ्यास करताना येणारा ताण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून शरीर आणि मन ताजेतवाने ठेवण्यासाठी नियमित शारीरिक हालचाली व प्राणायाम अत्यंत महत्त्वाचा आहे. शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यासाठी तसेच स्मरणशक्ती वृद्धिगंत होण्यासाठी, मनाची एकाग्रता वाढविण्यासाठीची योगासने योगशिक्षिका शिवानी पाटगांवकर यांनी प्रात्यक्षिक कृतीतून सांगितली. आर्ट ऑफ लिव्हिंगचे वरिष्ठ शिक्षक अजय किल्लेदार यांनी विद्यार्थ्यांना रोज सकाळी करता येईल अशा प्राणायाम व विविध सोपी योगासने  सांगितली. 

आज संपूर्ण समाज एका प्रकारच्या तणावातून जात आहे. अनेक क्षेत्रांमध्ये अशांतता आणि अस्थिरता वाढत आहे. अशा परिस्थितीत, योग आपल्याला शांतीची दिशा देतो. सध्याची जीवनशैली व त्याचे परिणाम लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सहित सर्वांनी योग साधना नियमित करणे गरजेचे असल्याचे प्राचार्य डॉ गजानन खाडे यांनी सांगितले. प्रास्ताविक व स्वागत प्रा. बी.पी.माळवे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. सुषमा पाटील यांनी केले.

 या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. गजानन खाडे, उपप्राचार्या श्रीमती व्ही. ए. खडके, आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वयंसेवक वेदांत कुंभार यांच्या सहित  प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक व १२ वीचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes