SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मंडप-पेंडॉलच्या तक्रारींसाठी तपासणी पथकांशी संपर्क साधा -दिपक शिंदेएसआयआर अंतर्गत मतदार यादीत पात्र मतदारांच्या समावेशासाठी राजकीय पक्षांचे सहकार्य आवश्यक : मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगलेयंदा सांगलीत रंगणार महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धा!!महापौर रुपाराणी निकम यांच्या जनता दरबारात 36 नागरिकांचे अर्ज दाखल; प्राप्त तक्रारी तातडीने निकाली काढण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाडॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलला ‘रोटरी’ कडून अत्याधुनिक नेफ्रोकेअर उपकरणे; ६३ लाखांचे वैदयकीय साहित्य प्रदान गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला; १८ ऑक्टोबरला मतदान, १९ ला निकालसंजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनांच्या पेन्शनमध्ये वाढ करा; शिष्टमंडळाची निवासी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणीकोल्हापूर महानगरपालिकेची धडक कारवाई : परवाना न घेता व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या दोन आस्थापना सीलवर्गीस कुरियन: भारतातील धवल क्रांतीचे शिल्पकार आणि अमूलचे जनककोल्हापूरला ५०० खाटांचे नवीन जिल्हा रुग्णालय; ४,२५० कोटींच्या 'प्रगती' प्रकल्पास मंजुरी

जाहिरात

 

एसआयआर अंतर्गत मतदार यादीत पात्र मतदारांच्या समावेशासाठी राजकीय पक्षांचे सहकार्य आवश्यक : मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले

schedule09 Sep 26 person by visibility 161 categoryराज्य

◼️कोणत्याही स्थितीत एक गठ्ठा अर्ज स्वीकारले जाणार नाहीत

कोल्हापूर : स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हीजन म्हणजेच एसआयआर या प्रक्रियेचा हेतू मतदारांची नावे कमी करणे हा नसून एकही पात्र मतदार यादीतून सुटणार नाहीत व अपात्र उमेदवाराचा समावेश यादीमध्ये राहणार नाही हा आहे. सुदृढ लोकशाहीसाठी मतदार यादी सुध्द, अद्ययावत असणे आवश्यक आहे. या दृष्टीने संपूर्ण यंत्रणा काम करत असून यामध्ये राजकीय पक्षांनी महत्वपूर्ण योगदान द्यावे, असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीं सोबत झालेल्या बैठकीत मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ  विजय राठोड, अपर आयुक्त महसूल स्वाती देशमुख, अपर जिल्हाधिकारी अजय पवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, लोकसभा, विधानसभा सदस्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शीतल तेली- उगले म्हणाल्या, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशनानुसार महाराष्ट्रासह इतर 13 राज्यामध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार याद्यांचे शुध्दीकरण केले जात आहे. सन 2002 नंतर जवळपास 24 वर्षांनी ही प्रक्रिया राबविली जात आहे. या काळामध्ये अनेक मतदार मयत झाले, काहींची नावे दुबार आली, काही स्थलांतरीत झाली या सर्व पार्श्वभूमीवर मतदार याद्यांचे शुध्दीकरण या बाबीला फार महत्व आहे. पात्र मतदार यादी बाहेर राहू नये व अपात्र उमेदवाराचा यादीत समावेश असू नये यासाठी बीएलओ स्तरापासून सर्वच यंत्रणा कार्यरत आहे. यामध्ये राजकीय पक्षांची भूमिका महत्वपूर्ण  आहे. तथापि, कोणत्याही परिस्थितीत नाव वगळणे किंवा कमी करणे यासाठी एक गट्टा अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. याची नोंद सर्वांनी घ्यावी. सुनावणी ही थेट संबंधित मतदारांचीच घेतली जाईल. पात्र मतदार यादीतून सुटले असल्यास त्यांच्यासाठी फॉर्म क्र 6 व दुरुस्ती तसेच स्थलांतरणासाठी फॉर्म क्र 8 ची प्रक्रिया सुरुच राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदार संघामध्ये मॅपिंग न झालेले 1 लाख 15 हजार 946 उमेदवार असून सुनावणी घेऊन त्यांचा निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच नाव, पत्ते, फोटो यामध्ये विसंगती असणारे 1 लाख 12 हजार 523 मतदार आहे.  यांची आवश्यक कागदपत्रे पाहून पडताळणी नंतर बीएलओ स्तरावरच याची कार्यवाही पूर्ण होईल. मात्र अनमॅप्ड मतदारांसाठी अधिकृत 12 कागदपत्रांच्या आधारे सहायक निवडणूक अधिकारी सुनावणी घेतील. मतदारांना कोणताही त्रास होवू नये, यासाठी सुनावणी बुथ स्तरावरच घेतली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्ह्यातील 18 वर्षावरील नागरिकांची मतदार यादीत नोंदणी व्हावी, यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहनही श्रीमती तेली-उगले यांनी केले.

यावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी फेर तपासणीचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी. वाढत्या नागरिकरणांचा विचार करुन मतदान केंद्राचे नियोजन व्हावे, मतदान केंद्र अद्ययावत व सर्व सोयीयुक्त असावी, त्यासाठी राजकीय पक्षांच्या सूचनांची दखल घेण्यात यावी. एकाच कुटुंबातील मतदारांचे मतदान एकाच ठिकाणी असावे. मतदार यादी अचूक करत असताना अपात्र उमेदवार पात्र होवू नये तसेच पात्र उमेदवार यादी बाहेर राहू नये यासाठी प्रशासनाने सजग रहावे असे सांगून यापुढेही राजकीय पक्ष एसआयआर प्रक्रियेमध्ये प्रशासनाला सहकार्य करतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.    

एसआयआर कार्यक्रमाचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून यानुसार मतदार केंद्राचे सुसूत्रीकरण, पुनरर्चना 24 ऑगस्ट 2026 रोजी झाली. प्रारुप मतदार यादी 31 ऑगस्ट रोजी प्रसिध्द करण्यात आली. दावे व हरकती दाखल करण्याची मुदत 30 सप्टेंबर पर्यंत आहे. त्यानंतर 29 ऑक्टोबर 2026 पर्यंत सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबर रोजी प्रसिध्द होणार आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes