SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीत २१ फुटी बाप्पाची मूर्ती कोसळली!जागतिक औषधविक्रेते दिन: आरोग्य व्यवस्थेचा कणाकरवीर तालुक्यातील दोन देवालयांना ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा; ४.४३ कोटींचा निधी; नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश​"आम्ही सगळे जुळे भाऊ!"; गोकुळ निवडणुकीत महायुतीचे विरोधकांना जोरदार आव्हानमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन नोंदणी करावारणा विद्यापीठाचा महारोजगार मेळावा निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे पुढे ढकललासार्वजनिक गणेश विसर्जनासाठी कोल्हापूर महापालिकेची यंत्रणा सज्जगोकुळ निवडणुकीत सत्यजित पाटील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीसोबत भूमिका केली स्पष्टजैविक शेतीला शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यावे : संतोष मोरेमहामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सुरक्षा उपाययोजना करा; आयटक संलग्न गोकुळ कर्मचारी संघटनेची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे मागणी

जाहिरात

 

कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीत २१ फुटी बाप्पाची मूर्ती कोसळली!

schedule25 Sep 26 person by visibility 439 categoryसामाजिक

कोल्हापूर:  कोल्हापुरातून गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये एक अत्यंत संतापजनक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास गोखले कॉलेज चौकात वाय. पी. पोवार नगर मंडळाची २१ फूट उंच भव्य गणेश मूर्ती अचानक रस्त्यावर कोसळली. 

  मिरवणूक मार्गावरील धोकादायक विद्युत तारा हटवण्यासाठी मंडळाने महावितरणकडे वारंवार विनंती करूनही प्रशासनाने डोळे झाक केली, परिणामी मूर्तीला तारेचा स्पर्श होऊन हा अपघात झाला. ट्रॅक्टर ट्रॉलीतून नेण्यात येणारी ही २१ फुटी महाकाय मूर्ती एका पायावर आणि झुकलेल्या अवस्थेत होती. ती कोसळल्यानंतर काही क्षणांसाठी परिसरात एकच सन्नाटा पसरला होता; मात्र सुदैवाने या भीषण दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली, तर कार्यकर्त्यांनी क्रेनच्या मदतीने मूर्ती बाजूला केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes