SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन नोंदणी करावारणा विद्यापीठाचा महारोजगार मेळावा निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे पुढे ढकललासार्वजनिक गणेश विसर्जनासाठी कोल्हापूर महापालिकेची यंत्रणा सज्जगोकुळ निवडणुकीत सत्यजित पाटील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीसोबत भूमिका केली स्पष्टजैविक शेतीला शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यावे : संतोष मोरेमहामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सुरक्षा उपाययोजना करा; आयटक संलग्न गोकुळ कर्मचारी संघटनेची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे मागणीशेतकऱ्यांनी घाबरू नये, सरकार पाठीशी; लवकरच दुष्काळ जाहीर होणार : हसन मुश्रीफमोफत आरोग्यसेवेसाठी अद्ययावत फिरता दवाखाना सुरू; चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण‘श्री गणेशा आरोग्याचा 2.0’ अंतर्गत 1 हजार 88 आरोग्य शिबिरेसत्यशोधक समाज: समता आणि सुधारणेचा क्रांतिकारी सरनामा

जाहिरात

 

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन नोंदणी करा

schedule24 Sep 26 person by visibility 127 categoryराज्य

कोल्हापूर : राज्य शासनाने महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, 2026 लागू केला आहे. या अधिनियमांतर्गत महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे व कृषी उपसंचालक नामदेव परीट यांनी केले आहे.

या कायद्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ‘शेतकरी’या संज्ञेची व्यापक मांडणी करण्यात आली आहे. यापुढे केवळ स्वतःच्या मालकीची शेतजमीन असलेल्या महिलांनाच नव्हे, तर शेती तसेच शेतीपूरक व संलग्न व्यवसायात कार्यरत असलेल्या महिलांनाही ‘महिला शेतकरी’म्हणून अधिकृत मान्यता मिळणार आहे. या कायद्याची तसेच माहिती पुस्तिकेची माहिती कृषी विभागाच्या https://krishi.maharashtra.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी https://krishi.maharashtra.in या संकेतस्थळाला भेट देऊन ‘Apply Now’ या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर नाव, गाव, आधार क्रमांक आणि आधार संलग्न मोबाईल क्रमांकाची माहिती भरावी. आधार संलग्न मोबाईलवर प्राप्त झालेला OTP नोंदवावा. त्यानंतर हमीपत्राचा चेक बॉक्स निवडून अर्ज ‘Submit’ करावा.

ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर ग्रामसभा किंवा नगरपंचायतीच्या ठरावाद्वारे महिला शेतकरी प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे. हवामान बदल, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि शाश्वत कृषी व्यवस्थेच्या उभारणीत महिलांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. महिला सक्षमीकरणाला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवून घेतलेला हा निर्णय ग्रामीण महाराष्ट्राच्या सामाजिक व आर्थिक परिवर्तनाला नवी दिशा देणारा ठरणार आहे.

महिला शेतकरी प्रमाणपत्र नोंदणीसाठी अधिक माहितीसाठी क्षेत्रीय स्तरावर कृषी सखी, उमेद सखी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा (ATM), तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा (BTM), सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes