करवीर तालुक्यातील दोन देवालयांना ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा; ४.४३ कोटींचा निधी; नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
schedule24 Sep 26 person by visibility 163 categoryउद्योग
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या बहिरेश्वर येथील श्रीकृष्ण मंदिर आणि खाटांगळे येथील श्री विठ्ठलाई देवी मंदिराला राज्य शासनाने ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देत पायाभूत सुविधांच्या विकासासाठी एकूण ४ कोटी ४३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
बहिरेश्वर येथील श्रीकृष्ण मंदिराला २३ मार्च २०२६ रोजी ‘ब’ वर्ग यात्रास्थळाचा दर्जा मिळाला असून, ग्रामविकास विभागाने १७ सप्टेंबर २०२६ रोजी १ कोटी ७३ लाख ३२ हजार रुपयांच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामध्ये मंदिराकडे जाणारा सिमेंट काँक्रिट पोहोच रस्ता व गटर्स, पालखी मार्ग, वाहनतळ तसेच प्रसादालयाच्या कामांचा समावेश आहे.
तर खाटांगळे येथील श्री विठ्ठलाई देवी मंदिरासाठी ७ ऑगस्ट २०२६ रोजी २ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे तरी यामध्ये समाविष्ट कामे प्रसादाले बनणे, पोहोच रस्ता करणे, पालखी मार्ग करणे, सुशिकीकरण करणे, संरक्षण भिंत बांधणे, वाहक व्यवस्थापन करणे तसेच सांडपाणी व्यवस्थापन करणे या कामांचा समाविष्ट आहे
या दोन्ही देवालयांना ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा तसेच भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला. ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या विभागामार्फत या विकासकामांना शासनस्तरावर प्रशासकीय मान्यता मिळून निधी उपलब्ध झाला. त्यांच्या सहकार्याबद्दलही मंदिर समित्या व ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त केली.
चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनस्वराज्य प्रदेशाध्यक्ष समीर कदम दादा आणि भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनीही यासाठी विशेष प्रयत्न केले. तसेच खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदीप नरके आणि ग्रामसेवक सरदार दिंडे यांचे सहकार्य लाभले.
या निधीमुळे दोन्ही मंदिरांच्या परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास होऊन भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, या दोन्ही गावांतील नागरिकांच्या वतीने तसेच मंदिर समित्या, विश्वस्त आणि ग्रामस्थांनी आज भाजपा जिल्हा कार्यालयात नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचा विशेष सत्कार करून मनापासून आभार मानले.
यावेळी खाटांगळे येथील नगरी अध्यक्ष कृष्णात पाटील (सर), आर. डी. पाटील, राजाराम गुरव, राजू पाटील, पांडुरंग मुगडे, ज्ञानदेव पाटील, हरीश पाटील, एकनाथ पाटील तसेच बहिरेश्वर येथील मा. सरपंच सूर्यकांत दिंडे , डे सरपंच कृष्णात दिंडे, सूर्यकांत मोरे, परशुराम पाटील, रंगराव कामत, सीमाताई हवालदार, मेघा ताई गोसावी, अनिल बचाटे, दिनकर दिंडे, राजाराम हवलदार, सचिन दिंडे असे सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.