SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोरे अभियांत्रिकी व टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स यांच्यात सामंजस्य करारकोल्हापूर महानगरपालिका महापौर, उपमहापौर निवड : महायुती, महाविकास आघाडीकडून अर्ज दाखलजिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीस मतदान; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टीमुलांमधील डिजिटल व्यसनाच्या अभ्यासासाठी तज्ज्ञांचा टास्क फोर्स नियुक्त करा : माहिती तंत्रज्ञान मंत्री अ‍ॅड. आशिष शेलारविद्यापीठस्तरीय रँकिंगमध्ये रसायनशास्त्र, अर्थशास्त्र अधिविभाग सर्वोत्कृष्ट; कामगिरीत सातत्य राखावे: कुलगुरू डॉ. सुरेश गोसावीकोल्हापूर जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृतीवर भर : जिल्हाधिकारीपश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे भिमा कृषी, पशू प्रदर्शन २०२६ १३ ते १६ फेब्रुवारी चार दिवस मेरी वेदर मैदान येथे आयोजित : खासदार धनंजय महाडिक यांची माहिती राशिवडेमध्ये गांजा विक्री करणाऱ्या एकास अटक, गांजा जप्ततरुणाईच्या प्रेमाचा, स्वाभिमानाचा आणि स्वॅगचा नवा आवाज - ‘रुबाब’ ६ फेब्रुवारीपासून प्रदर्शित!डीकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमाचा एमएसबीटीई परिक्षेत उच्चांकी निकाल

जाहिरात

 

कोरे अभियांत्रिकी व टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स यांच्यात सामंजस्य करार

schedule03 Feb 26 person by visibility 101 categoryशैक्षणिक

वारणानगर : तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, वारणानगर आणि टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स यांच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी, औद्योगिक प्रशिक्षणासाठी तसेच शैक्षणिक व औद्योगिक सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने दि. २८ जानेवारी २०२६ रोजी वारणानगर येथे सामाजिक सामंजस्य करार करण्यात आला. या करारावेळी  
श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. विलास व्ही. कारजिन्नी  व टाटा आयआयएस कडून मुख्य कार्यकारी अधिकारी  निधी गोयल, डॉ. सचिन सावंत उपस्थित होते. 

निधी गोयल म्हणाले की,  उद्योग–शिक्षण सहकार्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कौशल्याधारित, उद्योगाभिमुख व रोजगारक्षम शिक्षण देण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. कोरे अभियांत्रिकीस आयआयएस चे केंद्र करण्याचा मानस त्याने व्यक्त केला.या सामंजस्य करारांतर्गत टाटा आयआयएस येथे इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार विभागातील १२ विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी  निवड झाली असून यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील ५ विद्यार्थ्यांचीही प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. 

या सामाजिक कराराच्या कार्यक्रमास वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष माननीय डॉ. विनय कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी माननीय श्री. एन. एच. पाटील, कुलगुरू माननीय डॉ. डी. टी. शिर्के  यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या वेळी तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. डी. एन. माने, अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे, केंद्रिय प्रशिक्षण समन्वयक डॉ. बी. आर. बागणे, इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार विभागप्रमुख डॉ. एस. टी. जाधव तसेच इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार विभागातील सहाय्यक प्राध्यापक प्रा. स्नेहा बी. पायमल उपस्थित होते. 

या सामाजिक कराराअंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार तसेच यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासोबतच विद्यार्थ्यांसाठी कौशल्यविकास उपक्रम, औद्योगिक भेटी, मार्गदर्शन सत्रे व रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांची टाटा आयआयएस, मुंबई येथे औद्योगिक भेट यशस्वीरीत्या पार पडली.

तसेच या कराराच्या माध्यमातून तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, वारणानगर येथे टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्सचे प्रादेशिक केंद्र स्थापन करण्याबाबत नियोजन सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

या सामाजिक करारामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव, आधुनिक कौशल्ये व तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार असून भविष्यातील करिअरसाठी ते सक्षम होतील, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार विभागातील सहाय्यक प्राध्यापक प्रा. स्नेहा बी. पायमल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे प्रशासन, विभागप्रमुख, प्राध्यापकवृंद तसेच टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्सच्या प्रतिनिधींप्रती आभार व्यक्त करण्यात आले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes