निपाणी-गारगोटी रोडवर ३.६३ लाखांचा गुटखा जप्त; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई
schedule12 May 26 person by visibility 121 categoryगुन्हे
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील अवैध व्यवसायांविरुद्ध राबवलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. निपाणी ते गारगोटी रोडवरील हमीदवाडा फाटा येथे सापळा लावून बेकायदेशीर गुटख्याची वाहतूक करणारी अल्टो कार पकडण्यात आली.
आज दि. १२ मे रोजी, पोलीस अंमलदार गजानन गुरव यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत १,१३,७४० रुपये किमतीचा विविध कंपन्यांचा गुटखा (आर.एम.डी., विमल, कोल्हापुरी पान मसाला इ.) आणि वाहतुकीसाठी वापरलेली अल्टो कार (क्रमांक MH-09-EU-0409) असा एकूण ३,६३,७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी संशयित आरोपी संजय दशरथ कल्याणकर (वय ४१, रा. सोनारवाडी, ता. भुदरगड) याला ताब्यात घेण्यात आले असून, मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धरजकुमार आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने यशस्वी केली.