SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात शंभर कोटी रस्ते प्रकल्पातील कामे अपूर्ण का? 'आप'चा आयुक्तांच्या बैठकीत सवालकेएमटीचा कायापालट होणार; कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मुदतवाढीसह महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब!नमो उद्यानामुळे कुरुंदवाडच्या सौंदर्यात भर पडेल : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरकोल्हापूर जिल्ह्यात मत्स्य क्रांतीचे पाऊल; 'एफएफपीओ'च्या माध्यमातून ५००० कुटुंबांना मिळणार रोजगारकंत्राटदार नोंदणीस 15 मे पर्यंत मुदतवाढराज्यस्तरीय आरोग्य मानांकनात कोल्हापूर महापालिकेला प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुडसेवा आणि समर्पणाचा आधारवड: जागतिक परिचारिका दिनडीकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमा व बी.टेक.च्या आठ विद्यार्थ्यांची वेलस्पनमध्ये निवडआपत्ती व्यवस्थापन मान्सून पूर्वतयारी १५ दिवसात पूर्ण करा; अलमट्टी व हिप्परगीबाबत स्ट्राँग मॉनीटरींग गरजेचे : पालकमंत्री प्रकाश आबिटकर स्त्रीशक्तीच्या कौशल्यातून उ‌द्योग उभारणी शक्य: कविता देसाई

जाहिरात

 

नमो उद्यानामुळे कुरुंदवाडच्या सौंदर्यात भर पडेल : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

schedule12 May 26 person by visibility 98 categoryराज्य

▪️कुरुंदवाड शहरात २ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा प्रारंभ 

कुरुंदवाड : कुरुंदवाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, विविध विकासकामांमुळे शहराचा चेहरामोहरा बदलत आहे. महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत एक कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणारे 'नमो उद्यान' हे कुरुंदवाडच्या सौंदर्यात भर घालणारे ठरेल. शहरातील नागरिकांना आधुनिक सुविधा, विरंगुळा आणि स्वच्छ वातावरण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही कामे महत्त्वाचे ठरणार आहे. विविध विकासकामांमुळे शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ होऊन नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे, असा विश्वास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला.

कुरुंदवाड येथे २ कोटी रुपयांच्या विविध विकास कामाच्या प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या विशेष अनुदान सन २०२५-२६ योजनेंतर्गत विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. हालसिद्धनाथ मंदिर सभामंडप बांधकामासाठी ३५ लाख रुपये, हनुमान मंदिर सभामंडप हॉलसाठी २२ लाख रुपये, शिकलगार वसाहत सांस्कृतिक भवनाच्या खालच्या पहिल्या मजल्यासाठी ४३ लाख रुपये तर नमो उद्यानासाठी १ कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले की, कुरुंदवाड शहराच्या विकासासाठी आपण सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करून निधी आणत आहोत. शहरातील रस्ते, सांस्कृतिक सभागृह, उद्याने आणि इतर मूलभूत सुविधांच्या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. “नमो उद्यान” हे केवळ उद्यान नसून नागरिकांसाठी आरोग्यदायी आणि आकर्षक विरंगुळ्याचे केंद्र ठरेल. लहान मुलांसाठी खेळण्याची साधने, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था तसेच हरित वातावरण निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. शहरातील विकासकामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. आगामी काळातही कुरुंदवाड शहरासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून विकासाची गती कायम ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

यावेळी रामचंद्र डांगे, नगराध्यक्ष मनीषा डांगे, उपनगराध्यक्ष दिपक गायकवाड नगरसेवक जय कडाळे, वैभव उगळे, रमेश भुजुगडे, जवाहर पाटील, अक्षय आलासे, नगरसेविका सुनंदा आलासे, अलका मधाळे, जुबेरिया गोलंदाज, जयश्री पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक नगरसेविका, अँड विजय जमदग्नी, रामचंद्र मोहिते, सुनील सुतार, उदय डांगे, चंद्रकांत जोंग, शाहीर आवळे, उदय डांगे, दीपक पोमाजे, शरद आलासे, प्रकाश शहा, राजू पाटील, अजित देसाई, मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई, बांधकाम अभियंता राजेंद्र गवळी यांच्यासह नगरपरिषदेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes