SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
निपाणी-गारगोटी रोडवर ३.६३ लाखांचा गुटखा जप्त; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाईकोल्हापुरात शंभर कोटी रस्ते प्रकल्पातील कामे अपूर्ण का? 'आप'चा आयुक्तांच्या बैठकीत सवालकेएमटीचा कायापालट होणार; कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मुदतवाढीसह महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब!नमो उद्यानामुळे कुरुंदवाडच्या सौंदर्यात भर पडेल : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरकोल्हापूर जिल्ह्यात मत्स्य क्रांतीचे पाऊल; 'एफएफपीओ'च्या माध्यमातून ५००० कुटुंबांना मिळणार रोजगारकंत्राटदार नोंदणीस 15 मे पर्यंत मुदतवाढराज्यस्तरीय आरोग्य मानांकनात कोल्हापूर महापालिकेला प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुडसेवा आणि समर्पणाचा आधारवड: जागतिक परिचारिका दिनडीकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमा व बी.टेक.च्या आठ विद्यार्थ्यांची वेलस्पनमध्ये निवडआपत्ती व्यवस्थापन मान्सून पूर्वतयारी १५ दिवसात पूर्ण करा; अलमट्टी व हिप्परगीबाबत स्ट्राँग मॉनीटरींग गरजेचे : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

जाहिरात

 

केएमटीचा कायापालट होणार; कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मुदतवाढीसह महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब!

schedule12 May 26 person by visibility 158 categoryमहानगरपालिका

◼️प्रसाद जाधव यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन समितीची सभा संपन्न

कोल्हापूर  : कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन समितीची सभा आज के.एम.टी. प्रधान कार्यालयातील सभागृहामध्ये बोलाविणेत आली होती.  परिवहन समितीचे सभापती सत्यजीत जाधव हे आजच्या सभेस उपस्थित नसलेने, उपस्थित सदस्यांमधून श्री.प्रसाद धनाजीराव जाधव यांची “चेअरमन फॉर दि मिटींग” म्हणून निवड करणेत आली, त्यानंतर सभेच्या कामकांज सुरुवात झाली.  विषयपत्रिकेवरील कंत्राटी चालक, कंत्राटी वाहक व कंत्राटी सुरक्षा जवान यांच्या कंत्राटी मुदतीमध्ये वाढ करणेस मान्यता देणेत आली.  माऊली चौक येथील के.एम.टी.साठी आरक्षीत जागेचा प्रश्न दुर्वास कदम यांनी यावेळी उपस्थित केला.  या जागेसंबंधी न्यायालयीन प्रकरणांची माहिती देणेत आली.  के.एम.टी. बस थांब्यावरील अनधिकृत प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण आणणेसाठी सुरुवातीस महत्वाच्या बस थांब्यांवर पांढऱ्या रंगाचे पट्टे मारण्याच्या सुचना हेमंत आराध्ये यांनी दिल्या.  मार्गावरील बस संख्येमध्ये वाढ करणे, अवैध प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण आणणे, उत्पन्नामध्ये वाढ करणे इ. बाबत बैठकीमध्ये चर्चा करणेत आली.

 

यावेळी परिवहन समिती सदस्य उमेश पोवार, रोहन अतिग्रे, श्रीधर गाडगीळ, संतोष लाड, प्रशांत मोरे, महेंद्र कोरडे, अक्षय शेळके आदि सदस्यांनी चर्चेत भाग घेतला. या बैठकीस अति.परिवहन व्यवस्थापक डॉ.विजय पाटील, नगरसचिव सुनिल बिद्रे, कायदा सल्लागार ॲड.मुकुंद पवार, वर्क्स मॅनेजर दिपक पाटील, प्रकल्प विभाग प्रमुख पी.एन. गुरव, लेखापाल राजेंद्र सुर्यवंशी, वाहतूक निरिक्षक नितीन पोवार तसेच के.एम.टी.चे अधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes