दक्षिण कोरियातील ‘२०२५ इंटरनॅशनल वर्कशॉप ऑन इंजिनिअरिंग’साठी डॉ. कारजिन्नी व डॉ. बोरचाटे यांना निमंत्रण
schedule21 Oct 25 person by visibility 162 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कारजिन्नी आणि तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालय, येथील सीएसबीएस व सायबरसिक्युरिटी अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. सौरभ बोरचाटे यांना दक्षिण कोरियातील प्रतिष्ठित चुंगनाम नॅशनल युनिव्हर्सिटी (CNU), डेझॉन येथे आयोजित ‘२०२५ इंटरनॅशनल वर्कशॉप ऑन इंजिनिअरिंग विथ डिस्टींग्विश्ड स्कॉलर्स फ्रॉम एशियन कंट्रीज’ या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी सादर निमंत्रण प्राप्त झाले आहे.
वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांनी मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या आगामी आंतरराष्ट्रीय सहभागासाठी शुभेच्छा दिल्या.
ही कार्यशाळा २० ते २५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत होणार असून, आशियातील विविध देशांतील नामांकित विद्वान व संशोधक यात सहभागी होऊन अभियांत्रिकी क्षेत्रातील संशोधन, नवकल्पना आणि तांत्रिक प्रगतीविषयी विचारमंथन करतील या कार्यशाळेच्या निमित्ताने डॉ. कारजिन्नी आणि डॉ. बोरचाटे हे दक्षिण कोरियातील विविध अग्रगण्य विद्यापीठांना शैक्षणिक सहकार्य आणि संशोधन देवाणघेवाणीसाठी भेट देणार आहेत.
ते सर्वप्रथम २० ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर चुंगनाम नॅशनल युनिव्हर्सिटी (CNU) ला भेट देणार असून, या विद्यापीठाला QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 मध्ये #851–900 स्थान, विषयानुसार रँकिंगमध्ये #51–100, तर आशियाई रँकिंग (Eastern Asia) मध्ये #102 आणि एकूण आशियाई रँकिंगमध्ये #193 स्थान प्राप्त झाले आहे.
२३ ते २५ ऑक्टोबर २०२५ दरम्यान ते चोननॅम नॅशनल युनिव्हर्सिटी ला भेट देतील, ज्याला QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 मध्ये #901–950, विषयानुसार रँकिंगमध्ये #151–200 आणि आशियाई (Eastern Asia) रँकिंगमध्ये #104 स्थान प्राप्त झाले आहे.
तसेच ते गचॉन युनिव्हर्सिटी ला भेट देतील. या विद्यापीठाला QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी बाय सब्जेक्ट रँकिंगमध्ये #701–850, आशियाई (Eastern Asia) रँकिंगमध्ये #192 आणि एकूण आशियाई रँकिंगमध्ये #384 स्थान मिळाले आहे.
याशिवाय, ते आणखी दोन नामांकित दक्षिण कोरियन विद्यापीठांना भेट देऊन शैक्षणिक सहकार्य, विद्यार्थी देवाणघेवाण आणि संशोधन क्षेत्रातील नव्या संधींवर चर्चा करणार आहेत.
या संपूर्ण प्रवास आणि निवासाचा संपूर्ण खर्च CNU वर्कशॉप आयोजन समिती, रिपब्लिक ऑफ कोरिया यांनी प्रायोजित केला आहे. या निमंत्रणामुळे वारणा समूहाच्या शैक्षणिक आणि संशोधन कार्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त झाली आहे.