कोल्हापूर -राधानगरी मार्गावर टेम्पोची दुचाकीला धडक, बहिण-भावासह तिघे ठार
schedule21 Oct 25 person by visibility 1299 categoryगुन्हे

कोल्हापूरः कोल्हापूर-राधानगरी रोडवर कौलव येथे आज, मंगळवारी सकाळी चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोने दुचाकीस्वारास दिलेल्या धडकेत तिघे ठार झाले. श्रीकांत बाबासो कांबळे (तरसबळे, ता राधानगरी), दिपाली गुरुनाथ कांबळे (शेंडुर ता. कागल), पुतणी कौशिकी सचिन कांबळे अशी मृतांची नावे आहेत. तर अथर्व गुरुनाथ कांबळे (शेंडूर कागल) गंभीर जखमी झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी, श्रीकांत कांबळे हे बहिण दिपाली हिला घेवून बाजार घेण्यासाठी भोगावती येथे गेले होते. बाजार करुन घरी परतताना चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोने श्रीकांत यांच्या दुचाकीस धडक दिली. या धडकेत भाऊ श्रीकांत व बहिण दिपाली, पुतणी कौशिकी यांचा जागीच मृत्यू झाला. तर अथर्व गंभीर जखमी झाला.जखमी अथर्वला उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघातानंतरचे चित्र विदारक होते. यावेळी जिल्हा परिषदचे सदस्य पांडुरंग भांदिग्रे, सामाजिक कार्यकर्ते जयसिंग पाटील डॉ. दीपक कांबळे सागर कांबळे बीके कांबळे सचिन कांबळे आदी मदतीसाठी धावून आले. अपघातानंतर टेम्पो चालक पसार झाला. अपघातस्थळी मोठी गर्दी झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. ऐन दिवाळीतच अपघातात तिघे ठार झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.