SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
खरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत धान खरेदी योजना प्रभावीपणे राबविण्यास राज्य शासन कटिबद्ध - अग्रिम निधी वितरितआगामी काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ॲडव्हांटेज विदर्भ परिषद-२०२६कोल्हापुरात भीषण अपघात २ ठार, ५ जण जखमीसेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ.पॅट्रिक हर्मिनी यांचे मुंबईत आगमनप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्यासाठी ‘ब्लॉकचेन तंत्रज्ञान’ वापरण्यास मान्यता‘हिंद-दी-चादर’ अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या संख्येने विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे : निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीरघरफोडी करणारा आरोपी जेरबंद, 14 घरफोडीचे गुन्हे उघडकीसउत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

जाहिरात

 

कोल्हापुरात भीषण अपघात २ ठार, ५ जण जखमी

schedule07 Feb 26 person by visibility 424 categoryगुन्हे

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील शाहू मिल चौकात आज (दि.७) भीषण अपघात झाला. या अपघातात भाग्यश्री लक्ष्मण गवळी (वय ३०, रा. कसबा बावडा) आणि दीपक महादेव वंशी (वय ६२, रा. सनगर गल्ली, कोल्हापूर) या बाप लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत कार रस्त्यावरुन बाजूला करता वाहतूक सुरळीत केली. मात्र, अपघातस्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

शाहू मिल चौकात भरधाव चारचाकीने दुचाकींना उडविले. या भीषण अपघातात घटनास्थळीच दोन जणांचा मृत्यू झाला. अपघातात आणखी पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


 अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातस्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes