कोल्हापुरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती, स्फुर्ती सदन होणार
schedule29 Dec 24 person by visibility 180 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : राजारामपुरी टी.पी. स्कीम नं.१अशा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महान सुधारकांना त्यांचे १०४ व्या जयंती निमित्त करवीर वासियांमार्फत विनम्र अभिवादन. या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती व स्फुर्ती सदर उभारण्यात येणार आहे. याकरिता रक्कम रु.२.५२ कोटी इतका निधी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेमधून मंजूर झालेला आहे.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे तथा तुकाराम भाऊराव साठे हे महाराष्ट्राचे थोर समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. यांचा जन्म मागासवर्गीय समाजात झालेला असून त्यांचे लेखन सामजिक राजकीय कृतीशिलतेवर आधारलेले होते. ते आंबेडकर वादी विचारांचे पुरस्कर्ते असून त्यांचे साहित्य हे परीवर्तनाला दिशा आणि चालना देणारे होते. महाराष्ट्राच्या एकुण जडणघडण व परीवर्तनात त्यांचे साहित्याचे योगदान हे अत्यंत महत्वपुर्ण ठरले असून त्यांनी उपेक्षीतांच्या अंतरंगाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. उपजत बुध्दीवादी म्हणून त्यांच्या साहित्याचा धांडोळा घेता येतो. आज ही मोठ्या संख्येने विदयार्थी व अभ्यासक त्यांच्या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसून येतात. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लोक माणसात रुजविणेचे काम लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी केले आहे.
को.म.न.पा. प्र.क्र.३६, राजारामपुरी, टी.पी. स्कीम नं.१ हा विभाग कोल्हापूर शहाराच्या दुस-या सुधारीत विकास योजने नुसार रहिवास विभाग नॉन गावठाण स्पेसिफाईड एरिया मध्ये समाविष्ट आहे. या विभागामध्ये बहुतांश लोकवस्ती ही अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरीकांची आहे. यामध्ये प्रामुख्याने कष्टकरी, रोजंदारी, आरोग्य व स्वच्छता क्षेत्रामध्ये काम करणा-या लोकांचा समावेश आहे. उक्त परिसरातील लोकवस्ती ही दाटवस्तीची असून याठिकाणी वास्तव्य करण्या-या नागरिकांना शैक्षणिक सुविधा (वाचनालय, ग्रंथालय इ.) व अनुषंगीक साधनसामुग्री व पायाभूत सेवा-सुविधा अपुऱ्या पडत आहेत.
या परीसरातील नागरीक हे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपणारे असल्यामुळे परीसरातील नागरीकांची लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कृतीशील विचारांचे स्मारक तयार करणेची मागणी असून त्याठिकाणी लेखन, साहित्य, शाहीर कथा, कादंब-या लोकशिक्षणाकरीता उपलब्ध करुन देणेची मागणी आहे. या मागणीला मुर्त स्वरुप देणेच्या दृष्टीने कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे चिरंतर स्मारक भावी पिढीला प्रेरणा देणे कामी उपलब्ध व्हावे याकरिता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती व स्फुर्ती सदर उभारण्यात येणार आहे. याकरिता रक्कम रु.२.५२ कोटी इतका निधी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेमधून मंजूर झालेला आहे.
अशा या महान समाज सुधारकाची जन्मशताब्दी नुकतीच पार पडली आहे. या महान समाज सुधारकाच्या चिरंतर स्मृती जपणूक करणे कामी कोल्हापूर महानगरपालिकेने को.म.न.पा. प्र.क्र.३६ राजारामपुरी टी.पी. स्कीम नं.१ या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती व स्फुर्ती सदन इमारती उभारणी करणेचा संकल्प केला असून त्यामध्ये परीसरातील विद्यार्थी, कष्टकरी वर्ग, संशोधक यांना वाचनालय, ग्रंथालय, अभ्यासिका, प्रशिक्षण केंद्र इ. शैक्षणिक सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. यामधून परिसरातील नागरिकांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या लोकसाहित्यांचा परिचय होईल सदर स्मृती व स्फुर्ती सदनामध्ये तळ मजला व त्यावरील एक मजला असून एकूण ८५५ चौ.मी. चे बांधकाम क्षेत्र उपलब्ध असून पार्कीग, प्रथम मजलेवर ग्रंथालय आर्ट गॅलरी, तसेच प्रथम/द्वितीय मजलेवर वाचनालय सुविधा प्रस्तावीत केली आहे. उपरोक्त काम अण्णा भाऊ साठे यांच्या पुढील १०५ व्या जयंतीपुर्वी पुर्ण करुन त्याचे लोकार्पण करणेचा मानस / संकल्प कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे.