राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी मेहबूब शेख
schedule02 Jan 25 person by visibility 314 categoryसामाजिक
कोल्हापूर : माळ्याची शिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक आणि आरोग्य कर्मचारी संघटनेतील क्रियाशील नेते मेहबूब शेख यांची राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहॆ.
रुग्णसेवा क्षेत्रातील एक उपक्रमशील आरोग्यसेवक म्हणून ओळखले जाणारे मेहबूब शेख ग्रामीण आणि दुर्गम भागातील गोरगरीब रुग्णासाठी आधारवड म्हणून परिचित आहेत.
त्यांची राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहॆ.