तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी मध्ये ‘इंडस्ट्री रेडी इंजिनिअर्स’ कार्यशाळेचे यशस्वी आयोजन
schedule01 Jan 25 person by visibility 687 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनोमस) अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागात बी. टेक. च्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अभ्यासक्रम आणि उद्योग धंद्यातील अद्ययावत तंत्रज्ञान यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी “इंडस्ट्री रेडी इंजिनिअर्स प्रोग्राम- कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचा अभ्यासक्रम सात दिवसातील चाळीस तासांमध्ये विभागला गेला. तसेच दोन औद्योगिक भेटी हि या कार्यशाळे दरम्यान देण्यात आल्या.
या कार्यशाळेसाठी शिंपुगडे ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन बी. एस. शिंपुगडे, विनय कुलकर्णी, राजेंद्र नाईक, मयूरा स्टील प्रा. ली. चे चेअरमन चंद्रशेखर डोली, विक्रम साराभाई स्पेस सेंटर (ISRO) चे डॉ. चिदानंद मगदूम, प्रकाश देशपांडे, केएसबी टेकनॉलॉजि पुणे चे सचिन माताडे, किर्लोस्कर ऑइल इंजिन, कोल्हापूर चे डे. जनरल मॅनेजर निरंजन भोसले, आदिनाथ मगदूम, मयूर ग्रुप ऑफ कंपनीज चे अवधूत हरमलकर, श्री. समीर लाटकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यशाळेसाठी मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या आणि एमसीए, एमबीए च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. अधिष्ठाता ,डॉ.एस. एम. पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचा अभ्यासक्रम औद्योगिक गरजेनुसार तयार करण्यात आला. या कार्यशाळेचा सांगता समारंभ मार्व्हलस इंजिनियर्स प्रा.लि., कोल्हापूर चे व्यवस्थापकीय संचालक उद्योग तज्ज्ञ संग्राम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
ही कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष, डॉ. विनयरावजी कोरे यांनी शुभेच्छा दिल्या तसेच डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी, मुख्य कार्यकारी अधिकारी, वारणा विभाग शिक्षण मंडळ, संस्थेचे अधिष्ठाता, डॉ.एस. एम. पिसे, प्रभारी प्राचार्य डॉ. डी. एन. माने, विभाग प्रमुख डॉ. पी. व्ही. मुळीक, अकॅडेमिक कोऑर्डिनेटर प्रा. जी. एस. कांबळे यांनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले. समन्वयक म्हणून डॉ. एस. व्ही. लिंगराजु यांनी काम पाहिले.