प्रभाग क्रमांक 11 मधील शिवसेना महायुतीचे उमेदवार सत्यजीत जाधवसह अन्य उमेदवारांच्या समर्थनात भव्य रॅलीद्वारे जोरदार शक्ती प्रदर्शन
schedule13 Jan 26 person by visibility 135 categoryराजकीय
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2026 साठी प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेना महायुतीचे उमेदवार सत्यजित जाधव, भाजपच्या माधुरी नकाते व निलांबरी साळोखे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या यशोदा मोहिते यांच्या समर्थनात जोरदार शक्ती प्रदर्शन करत भव्य रॅली काढण्यात आली. या रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात समर्थक पक्षाचे ध्वज बॅनर घेऊन जोरदार घोषणाबाजी करत सहभागी झाले होते.
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची आज सायंकाळी सांगता होत असून शेवटच्या दिवशी प्रभाग क्रमांक 11 मधील शिवसेना महायुतीचे उमेदवार सत्यजित जाधव, भाजपच्या माधुरी नकाते व निलांबरी साळोखे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या यशोदा मोहिते यांच्यासह प्रचारार्थ प्रभागातील मुख्य मार्गावरून भव्य पदयात्रा काढण्यात आली या पदाचे मोठ्या प्रमाणात समर्थक सहभागी झाले होते. हातामध्ये फलक, ध्वज पक्षाचे ध्वज महायुतीच्या उमेदवारांना विजय करण्याच्या घोषणा तसेच पारंपारिक वाद्याचा ठेका यासह निघालेल्या पदद्यात्रा प्रभागातील मुख्य मार्गावरून काढण्यात आली.
यामध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी समर्थक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. याचबरोबर आज सायंकाळी प्रचाराचे सांगता होत आहे .

