कोल्हापूर महानगरपालिका : महापौर पद व इतर सर्व पद विभागणीबाबत निर्णय उद्या; महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक
schedule31 Jan 26 person by visibility 154 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर निवडी संदर्भात आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक हॉटेल अयोध्या याठिकाणी झाली. परंतु नामदार हसन मुश्रीफ याबैठीला उपस्थित राहू शकले नाही. उद्या मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत महापौर पद व इतर सर्व पद विभागणी बाबत निर्णय होईल.
भारतीय जनता पार्टी म्हणून या निवडीबाबत चर्चेतून आलेली नावे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठवण्यात येतील यावर निर्णय होऊन महापौर पदाचे नाव लवकरच निश्चित होईल.
याप्रसंगी नामदार चंद्रकांत दादा पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक,
प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव,
प्रा.जयंत पाटील, प्र.का.सदस्य राहुल चिकोडे, शारगंधर देशमुख यांची उपस्थिती होती.