SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूरच्या अक्षय मानेचा बँकॉक हायरॉक्स स्पर्धेत डंका; आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा!प्रतिसरकारचे शोषणमुक्त समाजाचे स्वप्न ‘जेन-झी’ने साकारावे: डॉ. भारत पाटणकरडी. वाय. पाटील विद्यापीठ तळसंदेच्या २७१ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवडऑर्केस्ट्रा कलाकारांच्या संघर्षावर प्रकाश टाकणारे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे: कुलगुरू प्रा. डॉ. आर. के. कामतविभाजन विभिषिका स्मृती दिन: वेदना आणि धड्यांचा इतिहासकेंद्रीय मंत्री रामदास आठवले,आमदार नीलम गोऱ्हे ,राजेंद्र गवई,राजू शेट्टी यांच्या सांत्वनपर भेटीसफाई कर्मचाऱ्यांच्या 35 कुटुंबांना राहती घरे देण्यास मंजुरी - राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांच्या हस्ते हस्तांतर पत्र वाटप बायोगॅस योजनेचे प्रलंबित लाभार्थी अनुदान मंजूर जिल्ह्यात लाळ खुरकत प्रतिबंधात्मक लसीकरणाची नववी फेरी सुरुकोल्हापूर जिल्ह्यात 26 ऑगस्टपर्यंत बंदी आदेश लागू

जाहिरात

 

कोल्हापूरच्या अक्षय मानेचा बँकॉक हायरॉक्स स्पर्धेत डंका; आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा!

schedule14 Aug 26 person by visibility 103 categoryक्रीडा

कोल्हापूर : कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा सुवर्णतुरा रोवला गेला आहे. कोल्हापूरचा युवा खेळाडू अक्षय माने याने थेट बँकॉकमध्ये पार पडलेल्या प्रतिष्ठित 'हायरॉक्स' (HYROX) स्पर्धेत दमदार कामगिरी करत आपले कर्तृत्व आंतरराष्ट्रीय पातळीवर सिद्ध केले आहे.

कोल्हापूरच्या मातीतून घडलेल्या अक्षयने या जागतिक स्तरावरील अत्यंत कठीण स्पर्धेत सहभाग घेत आपल्या शारीरिक तंदुरुस्ती आणि क्रीडा कौशल्याचे अप्रतिम प्रदर्शन घडवले. हायरॉक्स ही स्पर्धा जगातील सर्वात आव्हानात्मक फिटनेस रेसपैकी एक मानली जाते, ज्यासाठी प्रचंड शारीरिक क्षमता, अफाट मानसिक ताकद आणि सातत्यपूर्ण प्रशिक्षणाची आवश्यकता असते. या खडतर स्पर्धेसाठी अक्षयने गेल्या काही महिन्यात घेतलेली कठोर मेहनत आणि फिटनेसवरील विशेष फोकस कामी आला.

अक्षयच्या या यशामागे त्याच्या संपूर्ण टीमचे मोठे योगदान आहे. आकाश काळे, आर. डी. सर, संतोष सर, आकाश कोरगावकर, मुबारक सर आणि पवन माडेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन त्याला लाभले. तसेच, आई-वडिलांचे सततचे प्रोत्साहन आणि मित्रपरिवाराची खंबीर साथ यामुळे त्याचा आत्मविश्वास अधिक बळावला.

अक्षयच्या या देदिप्यमान यशामुळे कोल्हापूरच्या क्रीडा आणि फिटनेस वर्तुळात आनंदाचे वातावरण असून, नव्या पिढीला एक नवी प्रेरणा मिळाली आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

> "कठोर मेहनत, योग्य मार्गदर्शन आणि जिंकण्याची जिद्द..." याच त्रिसूत्रीच्या जोरावर अक्षय मानेने बँकॉकमध्ये कोल्हापूरचा झेंडा फडकवत ऐतिहासिक यश संपादन केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes