केंद्रीय मंत्री रामदास आठवले,आमदार नीलम गोऱ्हे ,राजेंद्र गवई,राजू शेट्टी यांच्या सांत्वनपर भेटी
schedule13 Aug 26 person by visibility 171 categoryसामाजिक
कोल्हापूर : केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विधान परिषदेच्या माजी उपसभापती आमदार नीलम गोऱ्हे, राजेंद्र गवई, राजू शेट्टी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आज कसबा बावड्यातील यशवंत निवासस्थानी जाऊन पद्मश्री डॉ डी वाय पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतूराज पाटील यांच्यासह पाटील कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केलं.
पद्मश्री डॉ डी वाय पाटील यांच्या निधनानंतर आज देखील पाटील कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती. आज सायंकाळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विधान परिषदेच्या माजी उपसभापती आमदार नीलम गोऱ्हे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या गवई गटाचे राजेंद्र गवई ,माजी खासदार राजू शेट्टी, यांनी आज कसबा बावड्यातील यशवंत निवासस्थानी भेट दिली. आणि पद्मश्री डॉ डी वाय पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यानंतर त्यांनी पाटील कुटुंबीयांची भेट घेवून त्यांचं सांत्वन केलं. दिवंगत डॉ डी वाय पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात उत्तम असं काम केलं, राज्यपाल असताना देखील त्यांनी लक्षणीय काम केलं. अशी प्रतिक्रिया आमदार नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.
दरम्यान आज दिवसभरात आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, कर्नाटकचे आमदार राजू कागे, माजी आमदार सौम्या रेड्डी, संजीवराजे नाईक निबांळकर फलटण, आनंद मर्दा, माजी आमदार जयश्री जाधव, काँग्रेस प्रदेश सचिव सत्यजित बिराजदार, मल्लिनाथ कलशेट्टी, वसमतचे माजी नगराध्यक्ष अब्दुल हाफिज, अँड ऋषिकेश देशमुख, संजय जमदाडे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक, गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे, संग्रामसिंह कुपेकर, रामराजे कुपेकर, किसन चांदणे, विठ्ठल वास्कर महाराज पंढरपूर, सुहास लटोरे, मारुती माने,भीमाशंकर जमादार अथणी शुगरचे उत्तम पाटील, जिल्ह्यातील विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सांत्वनपर भेटी घेतल्या .