SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विश्वविजेता भारत! अहमदाबादमध्ये रचला इतिहास; न्यूझीलंडचा ९६ धावांनी धुव्वा उडवत टीम इंडिया तिसऱ्यांदा 'चॅम्पियन'कोल्हापुरात हुल्लडबाज वाहनधारकांना रंगपंचमी महागात; वाहतूक पोलिसांकडून ३ लाख १७ हजारांचा दंड वसूलडी वाय पाटील अभियांत्रिकीमध्ये ''वूमन इन लीडरशिप' कार्यक्रम उत्साहात‘गोकुळ’ मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा भाजपा महिला मोर्चाच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजराकागल मध्ये रविवारी जलद बुद्धिबळ स्पर्धाकोल्हापूर मर्कजचे प्रमुख (आमिरसाब) हाजी दिलावर मुल्लाणी यांचे निधनकोरे अभियांत्रिकीचे वार्षिक स्नेहसंमेलन "स्पंदन २०२६" उत्साहातसपना अरविंद कुपेकर-घुणकीकर : जिद्द, परिश्रम आणि प्रामाणिक सेवेतून घडलेला प्रेरणादायी प्रशासकीय प्रवासT20 विश्वचषक: जेतेपदासाठी आज भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने

जाहिरात

 

कोरे अभियांत्रिकीचे वार्षिक स्नेहसंमेलन "स्पंदन २०२६" उत्साहात

schedule08 Mar 26 person by visibility 356 categoryशैक्षणिक

वारणानगर : येथील तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, तंत्रनिकेतन, एमबीए, एमसीए, विधी महाविद्यालय आणि आर्किटेक्चर यांचे वार्षिक स्नेहसंमेलन “स्पंदन २०२६” उत्साहपूर्ण वातावरणात आणि विद्यार्थ्यांच्या मोठ्या सहभागात साजरा करण्यात आला. 

स्नेहसंमेलनाची सुरुवात सहकार महर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

हे स्नेहसंमेलन तीन दिवस चालले. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि मजेशीर खेळांचे आयोजन केले होते. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, नियोजन कौशल्य आणि उद्योजकतेची जाणीव वाढीस लागली. त्यानंतर पारंपरिक दिवस साजरा करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान आदी राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा आणि सादरीकरणातून घडवले. यानंतर झालेल्या फॅशन शोमध्ये विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि व्यक्तिमत्त्वाचे आकर्षक प्रदर्शन केले.

दुसऱ्या दिवशी आयोजित कला प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या चित्रकला, रांगोळी आणि विविध हस्तकलेच्या उत्कृष्ट कलाकृतींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर झालेल्या ऑर्केस्ट्रा (गायन) कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सुरेल गीतांनी वातावरण भारावून टाकले.

तसेच लेखक व दिग्दर्शक  स्वप्नील माधवी पंडित गुंडरे व विद्यार्थ्यांनी सादर केलेले “इतिहास म्हणजे प्रेरणा की फक्त भूतकाळ?” हे नाट्य स्पंदन २०२६ चे मुख्य आकर्षण ठरले. यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील परिस्थिती आणि आजच्या काळातील बदल यांचे प्रभावी व विचारप्रवर्तक चित्रण करण्यात आले.

तिसऱ्या दिवशी झालेल्या फिशपॉण्ड उपक्रमाने हास्याची बरसात केली. त्यानंतर “अक्षस्त्र” (विद्यार्थ्यांचा ऑर्केस्ट्रा) मध्ये विद्यार्थ्यांनी वाद्यसंगीत आणि गायनाचे अप्रतिम सादरीकरण केले. पुढे आयोजित नृत्य कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या जोशपूर्ण नृत्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

या कार्यक्रमासाठी प्रमुख निमंत्रित म्हणून  समीर एम. शिंगटे (उपजिल्हाधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी, पन्हाळा), मनोज एफ. कदम (अध्यक्ष, एस. व्ही. ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, छ. संभाजीनगर),  प्रताप बी. पाटील (मुख्य कार्यकारी अधिकारी, वालस्टार टेक्नॉलॉजीज प्रा. लि., कोल्हापूर) आणि  निखिल अत्रे (संचालक – तांत्रिक, गोयल गंगा कॉर्पोरेशन, पुणे) उपस्थित होते.

वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष, डॉ. विनय कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी प्रा. एन. एच. पाटील आणि कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कारजिन्नी यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच प्रशासकीय अधिकारी प्रा. जे. के. शिंदे, प्राचार्य डॉ. डी. एन. माने आणि अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या स्नेहसंमेलनाचे समन्वयक प्रा. ए. एस. फले, डॉ. एन. एस. धाराशिवकर (अधिष्ठाता विद्यार्थी कल्याण), प्रा. एस. एच. मोरे (सहयोगी अधिष्ठाता, विद्यार्थी कल्याण व समन्वयक – सांस्कृतिक समिती) तसेच टीकेआयईटी जनरल सेक्रेटरी श्री. अवधूत बी. साळुंखे व को- जनरल सेक्रेटरी समर्थ जे. खाडे व मयुरी रणसिंग यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

 

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes