कोल्हापूर मर्कजचे प्रमुख (आमिरसाब) हाजी दिलावर मुल्लाणी यांचे निधन
schedule08 Mar 26 person by visibility 690 categoryराज्य
कोल्हापूर : कोल्हापूर मर्कज प्रमुख अर्थात धर्मगुरू हाजी दिलावर मुल्लाणी (बालिंगे) यांचे आज रविवारी दुःखद निधन झाले आहे, त्यांचा दफनविधी आज रात्री तराबिह च्या नमाज नंतर 10 वाजून 30 मिनिटांनी बागलचौक कब्रस्तान येथे होणार आहे,
गेली 15 वर्षे कोल्हापूर मर्कजचे प्रमुख धर्मगुरू म्हणून ते कार्यरत होते, त्यामुळे त्यांचा कोल्हापूर व आसपासच्या जिल्ह्यात मोठा संपर्क होता.मुस्लीम समाजातील प्रत्येक घटकांशी त्यांचे अतूट नाते निर्माण झाले होते, प्रत्येकाला सोबत घेऊन जाण्याच्या व समाजातील उदभवणाऱ्या प्रत्येक प्रश्नांच्या सोडवणूकीत त्यांची प्रमुख भूमिका असे. निहाल पैलवान मस्जिद अर्थात कोल्हापूर जिल्हा मर्कजचे केंद्र .या ठिकाणी दररोज ते आपल्या सहकाऱ्यांसोबत बैठकीत असायचे.आपली प्रकृती स्थिर नसताना देखील जिल्ह्यात दौरा करून मुस्लिम समाजातील प्रश्नांची सोडवणूक करण्यात त्यांचा पुढाकार होता..
मुस्लिम समाजाचे धर्मगुरू म्हणून महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश , उत्तर प्रदेश दिल्ली,या ठिकाणी त्यांना मानणारा वर्ग खूप मोठा होता.