कोरे अभियांत्रिकीत वार्षिक गुण गौरव सोहळा उत्साहात
schedule27 Apr 25 person by visibility 349 categoryशैक्षणिक

▪️कंप्यूटर सायन्स अँड इंजीनियरिंग विभागाची तनिषा शिंदे यावर्षीची बेस्ट आउटगोइंग स्टूडेंट
वारणानगर : तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनॉमास) अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सन २०२४-२५ चा गुण गौरव समारंभ नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमात गतवर्षी शैक्षणीक क्षेत्रात विद्यापीठ, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग कामगिरी करणाऱ्या ३०० हुन अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. गुणगौरव कार्यक्रमांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय आणि अंतिम वर्षातील रँक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो. तसेच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी घेतलेल्या परीक्षेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा सुद्धा गौरव केला जातो त्याच बरोबर देश पातळीवरील गेट सारख्या स्पर्धेमध्ये आपला ठसा उमटवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव या कार्यक्रमांमध्ये झाला.
वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष, डॉ. विनयरावजी कोरे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन रवी डोल्ली, सदस्य, सीआयआय आणि कार्यकारी संचालक मयुरा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज लि. कोल्हापूर हे उपस्थित होते. त्यांनी मनोगतात त्यांचा यशस्वी उद्योजक होण्याचा संस्मरणीय व प्रेरणादायक प्रवास सांगितला. तसेच महाविद्यालयाचे शिक्षण पद्धती, इमारती व व्यवस्थापनाचे विशेष कौतुक केले. पुढे ते म्हणाले कि, विद्यार्थ्यांनी विविध सीईओ सोबत आपले संभाषण तसेच आपले नेटवर्क वाढवले पाहिजे.उद्या तुम्ही पण एका कंपनीचे सीईओ नक्कीच होणारं हे स्वप्न बघा. दिवसेंदिवस तंत्रज्ञानामध्ये होणारे बदल स्वीकारून प्रगती करणे गरजेचे आहे.
श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे, मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. व्ही. व्ही.कारजिन्नी, यांनी सर्व विजेत्यांचे व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व उद्योग क्षमता ही आजच्या काळाची गरज असल्याचे सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ.बी. टी. साळोखे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक केले. अधिष्ठाता, डॉ. एस. एम. पिसे यांनी कोरे अभियांत्रिकी विषयी माहिती सांगितली. कार्यक्रमांचे आभार समन्वयक डॉ. सौ.व्ही. डी. पाटील यांनी मानले. यावेळी राजाराम काळे, डॉ के. आय. पाटील, प्रा. डी. बी मिरजकर, डीन, प्राध्यापक, स्टाफ, पालक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. मुख्य कार्यक्रमाचे नियोजन डॉ. मार्क मोनिस, प्रा. गणेश कांबळे, डॉ. समाधान जाधव, प्रा. मिलींद कामत यांनी केले. तन्वी पाटील, श्रेयस श्रीराम, कृतिका पाटील, वैष्णवी पाचफुले, राजनंदिनी पाटील, ओमकुमार हिरेमठ, अदिती घाटगे, वैष्णवी भोकरे, ज्ञानदा घेवडे, प्रीतम पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
या वर्षीचा बेस्ट आउटगोइंग स्टूडेंट होण्याचा मान तनिषा शिंदे हिने पटकावला.यामध्ये वेगवेगळे निकष, चाचण्या व एक्स्ट्रनल एक्स्पर्ट कडून बेस्ट आउटगोइंग स्टुडंटची निवड होते. बेस्ट आउटगोइंग स्टुडन्ट हा पुरस्कार कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये गेली ३३ वर्षे दिला जातो. हा पुरस्कार मिळालेले विद्यार्थी देशात आणि विदेशात उच्च पदावर कार्यरत आहेत.