SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
दर्जेदार वैद्यकीय शिक्षणाबरोबरच अत्याधुनिक वैद्यकीय सेवा-सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफराजर्षी छत्रपती शाहू महाराजांवरील तीन चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत; अक्षरगप्पांमध्ये व्ही .बी. पाटील यांची माहितीपनवेल महानगरपालिकेच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्रातून गुणवत्ताधारक खेळाडू घडतील : मंत्री ॲड. आशिष शेलारग्रेट बॉम्बे सर्कस दाखल; कोल्हापूरकरांना धमाल मनोरंजन अनुभवता येणारपारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवेसाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमशिवाजी विद्यापीठाचा सॉफ्टबॉल महिलांचा संघ जाहीर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण : शाळा संकुल प्रभावी व्यवस्थापनकोरे अभियांत्रिकीत वार्षिक गुण गौरव सोहळा उत्साहात सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये राष्ट्रीय पातळीवरील परिषद उत्साहात विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्यावा : शिक्षणाधिकारी मीना शेंडकर

जाहिरात

 

विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्यावा : शिक्षणाधिकारी मीना शेंडकर

schedule26 Apr 25 person by visibility 247 categoryशैक्षणिक

▪️डी. वाय. पाटील विद्यानिकेतन येथे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात 
कोल्हापूर :  शिक्षण हे केवळ गुण मिळवण्यापुरते मर्यादित नसून, व्यक्तिमत्व विकासासाठी देखील ते अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्यावा असे आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक  शिक्षणाधिकारी सौ. मीना शेंडकर यांनी केले.  डी वाय पाटील विद्यानिकेतन (सीबीएसई), साळोखेनगर येथे आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्यात  प्रमुख अतिथी म्हणून  त्या बोलत होत्या. 

आपल्या भाषणात शेंडकर यांनी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम, सकारात्मक दृष्टिकोन आणि गुणवत्ता आधारित शिक्षणाची महत्ता पटवून दिली.यावेळी पालक वर्गालाही त्यांनी पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी.वाय पाटील नॉलेज कॅम्पसचे संचालक डॉ. अभिजीत माने होते. प्राचार्या डॉ. शांतीकृष्णमूर्ती यांनी स्वागत आणि प्रस्ताविक करताना शाळेच्या शैक्षणिक व सर्वांगीण प्रगतीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत शाळा त्यांचा सर्वतोपरी विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध नृत्य, नाट्य व गीतांच्या कार्यक्रमांनी वातावरण रंगतदार केले. पालक आणि पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या कलेला भरभरून दाद दिली. 
     
 या कार्यक्रमाला संस्थचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त  ऋतुराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes