SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
​'शक्तीपीठ' महामार्गाला शेतकऱ्यांचा 'विठ्ठला'कडे धाव; पंढरपुरात मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून साकडे!स्वप्नांना आकार देणारे करिअर म्हणजे वास्तुकला : डॉ. ए. के. गुप्तादिल्लीवारी: राष्ट्रपती भवनात सादरीकरणासाठी सज्ज असलेल्या श्रीजा फाउंडेशनच्या कलाकारांचा खासदार महाडिकांकडून सत्कार​"होमिओपॅथी, आयुर्वेद आणि योग महाविद्यालयांसह ग्रामीण आरोग्य पथक परिसरातील अत्यावश्यक सुविधा जलदगतीने उभाराव्यात."नीट परीक्षेत संजय घोडावत आयआयटी अँड मेडिकल अकॅडमीचे राष्ट्रीय स्तरावर यशरोटरी क्लब ऑफ गार्गीजचा १९ वा पदग्रहण सोहळा उत्साहातलोकशाहीर अण्णाभाऊ साठे: वंचितांच्या वेदनांचा बुलंद आवाजकरवीर तहसिल कार्यालयात सोमवारी लोकशाही दिनथकीत भाडे न भरलेल्या सहा गाळ्यांना महापालिकेचा सीलकृषी व कृषी संलग्न पदवी प्रवेशासाठी डी. वाय. पाटील कृषी संकुलात निशुल्क मार्गदर्शन

जाहिरात

 

स्वप्नांना आकार देणारे करिअर म्हणजे वास्तुकला : डॉ. ए. के. गुप्ता

schedule18 Jul 26 person by visibility 185 categoryशैक्षणिक

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरतर्फे प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन 

कोल्हापूर : आर्कीटेक्चर अर्थात वास्तुकला  हे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला दिशा देत समाजाच्या विकासात मोलाचे योगदान देणारे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भविष्य घडविणारे करिअर आहे.  हे क्षेत्र केवळ इमारतींची रचना करण्यापुरते मर्यादित नसून सर्जनशीलता, पर्यावरणपूरक विचार, संशोधन आणि नावीन्यपूर्ण कल्पनांना आकार देणारे क्षेत्र असल्याचे प्रतिपादन डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी केले.

डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कसबा बावडा येथील स्कूल ऑफ आर्किटेक्चरतर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या बी.आर्क. प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी व पालकांसाठी आयोजित मार्गदर्शन परिसंवादात ते बोलत होते. बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी, पालक तसेच वास्तुकला क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या परिसंवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

डॉ. गुप्ता म्हणाले, आजच्या बदलत्या युगात वास्तुविशारदाची भूमिका केवळ इमारतींची रचना करणाऱ्या व्यावसायिकाची राहिलेली नाही. स्मार्ट सिटी, शाश्वत विकास, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक नियोजन या क्षेत्रांमध्ये वास्तुविशारदांना मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःची आवड, सर्जनशीलता आणि कौशल्यांचा योग्य वापर करून या क्षेत्रात करिअर घडवावे.

परिसंवादात बी.आर्क. प्रवेशासाठी आवश्यक पात्रता, नाटा व जेईई पेपर २ परीक्षा, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ मधील महत्त्वाचे बदल, शिष्यवृत्ती, आरक्षण, आवश्यक कागदपत्रे, प्रवेश क्षमता, सीट वितरण तसेच प्रवेश प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले

यावेळी स्कूल ऑफ आर्किटेक्चरमधील एआय, बीआयएम, डिजिटल ट्वीन, पॅरामेट्रीक डिझाईन, स्मार्ट सिटीज, ३ डी प्रिंटींग यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अध्यापन, सुसज्ज स्टुडिओ व प्रयोगशाळा, उद्योगाभिमुख प्रशिक्षण, इंटर्नशिप, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधी तसेच विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर पटकाविलेल्या नासा आर्की. लुईस आय कान ट्रॉफी बद्दल माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. रोजगाराबरोबरच उद्योजकतेच्या वाढत्या संधींवरही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

स्कूल ऑफ आर्किटेक्चरचे प्रमुख प्रा. इंद्रजीत जाधव यांनी स्वागत करून संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. प्रवेश समन्वयक आर्कि. मंजित जाधव व आर्कि. तिलोत्तमा पाडळे व सर्व प्राध्यापक यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी प्राचार्य डॉ. एस. डी. चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, अधिष्ठाता डॉ. राहुल पाटील, प्रवेश प्रक्रिया प्रमुख प्रा. रवींद्र बेन्नी यांच्यासह  विभागप्रमुख, प्राध्यापक विद्यार्थी व पालकवर्ग उपस्थित होते. 

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes