SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन गणपतीसाठी तब्बल ६ लाख कोकणवासियांनी एसटीने केला सुखरुप प्रवास : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; २३ कोटी ७७ लाख रुपये उत्पन्नके.एम.टी.ची 'श्री दुर्गादर्शन' विशेष बस सेवा दि.22 सप्टेंबरपासून सुरु संजय घोडावत यांचा आचार्य श्री दर्शनसागरसूरीश्वरजी पुरस्काराने गौरव चित्रनगरीसंदर्भात कोल्हापुरात चर्चासत्रकोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव : संस्कृती आणि परंपरांचा उत्सव : जिल्हाधिकारी अमोल येडगेधर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि सुधारणावाद हेच भारतीय संविधानाचे तत्वज्ञान: डॉ. टी. एस. पाटीलपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीने विविध कार्यक्रम नगररचना विभागाकडून आयोजित विशेष कॅम्पमध्ये 64 प्रकरणे मंजूरस्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत आयोजित शिबिराचा 250 लाभार्थ्यांनी घेतला लाभ

जाहिरात

 

गणपतीसाठी तब्बल ६ लाख कोकणवासियांनी एसटीने केला सुखरुप प्रवास : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; २३ कोटी ७७ लाख रुपये उत्पन्न

schedule18 Sep 25 person by visibility 91 categoryराज्य

मुंबई : गणपती उत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर क्षेत्रातून सुमारे ५ लाख ९६ हजार पेक्षा जास्त कोकणवासीयांनी एसटीने सुखरूप प्रवासाचा आनंद घेतला. याद्वारे एसटीला सुमारे २३ कोटी ७७ लाख रुपये उत्पन्न मिळाले. तथापि, आप-आपल्या गावी, वाड्या-वस्त्यावर या लाखो कोकणवासीयांना सुखरूप घेऊन जाणारे आमचे बहाद्दर चालक-वाहक त्यांना मदत करणारे यांत्रिक कर्मचारी व मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक -अधिकारी अभिनंदनास पात्र आहेत, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

यंदा गणपती उत्सवासाठी एसटीद्वारे कोकण वासियांसाठी ५ हजार जादा एसटी बसेसची सोय करण्यात आली होती. या बसेस द्वारे १५ हजार ३८८ फेऱ्यातून ५ लाख ९६ हजार प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला. अर्थात, एसटी महामंडळाने या प्रवाशांची सुरक्षित आणि अपघात विरहित वाहतूक करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

२३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या काळामध्ये चालवलेल्या या वाहतुकीमध्ये एसटी प्रशासनाने सुयोग्य नियोजनाच्या आधारे गेल्या अनेक वर्षातील सर्व विक्रम मोडून काढत यंदा तब्बल ५००० बसेसद्वारे ५ लाख ९६ हजार पेक्षा जास्त प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली आहे. अर्थात, यासाठी राज्यभरातील विविध आगारातून आलेले १० हजार पेक्षा जास्त चालक-वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे अधिकारी यांनी विविध अडचणींना धैर्याने सामोरे जात एवढी प्रचंड वाहतूक सुरक्षित पार पाडली, ते कौतुकास्पद आहे , असेही मंत्री श्री. सरनाईक यांनी सांगितले.

कोकणातील गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून, २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या काळात एसटीची वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत होते. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात आली होती. नादुरुस्त बसेस ना पर्याय म्हणून चिपळूण,महाड व माणगाव आगारात १०० बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes