SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गणपतीसाठी तब्बल ६ लाख कोकणवासियांनी एसटीने केला सुखरुप प्रवास : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; २३ कोटी ७७ लाख रुपये उत्पन्नके.एम.टी.ची 'श्री दुर्गादर्शन' विशेष बस सेवा दि.22 सप्टेंबरपासून सुरु संजय घोडावत यांचा आचार्य श्री दर्शनसागरसूरीश्वरजी पुरस्काराने गौरव चित्रनगरीसंदर्भात कोल्हापुरात चर्चासत्रकोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव : संस्कृती आणि परंपरांचा उत्सव : जिल्हाधिकारी अमोल येडगेधर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि सुधारणावाद हेच भारतीय संविधानाचे तत्वज्ञान: डॉ. टी. एस. पाटीलपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीने विविध कार्यक्रम नगररचना विभागाकडून आयोजित विशेष कॅम्पमध्ये 64 प्रकरणे मंजूरस्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत आयोजित शिबिराचा 250 लाभार्थ्यांनी घेतला लाभकोल्हापूर महानगरपालिका प्रारुप प्रभाग रचनेवरील प्राप्त हरकतींची शुक्रवारी सुनावणी

जाहिरात

 

के.एम.टी.ची 'श्री दुर्गादर्शन' विशेष बस सेवा दि.22 सप्टेंबरपासून सुरु

schedule18 Sep 25 person by visibility 124 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमामार्फत सोमवार दि.22/09/2025 ते बुधवार दि.01/10/2025 या कालावधीत शारदीय नवरात्रोत्सवानिमित्य भाविक प्रवाशांच्या सोईसाठी 'श्री दुर्गादर्शन विशेष बस सेवा' सुरु करणेत येत आहे. यावर्षी या सेवेसाठी वातानुकुलीत बसेस देणेत येणार आहेत.

या बससेवेचा आगाऊ आरक्षण तिकीट विक्री शुभारंभ शनिवार दि.20/09/2025 रोजी सकाळी 10.00 श्री शाहू मैदान पास वितरण केंद्र येथे होणार आहे. या बससेवेसाठी प्रौढास रु.185/- व 3 ते 12 वयोगटातील बालकांना रु.95/- असा दर निश्चीत करणत आलेला आहे. दैनंदिन सकाळी 9.00 ते सायंकाळी 7.00 या वेळेत सदर बससेवेचे आगाऊ आरक्षण पास वितरित करणेत येतील. बससंख्येअभावी चालूवर्षी ग्रुप बुकींग सेवा व जादा बसेस बंद ठेवणेत आलेल्या आहेत.  

अधिक माहितीसाठी श्री शाहू मैदान वाहतूक नियंत्रण केंद्र येथे दुर्गा र्शन सेवेचे प्रमुख सुनिल पाटील-9890080790, नितीन पोवार – 9422589878, ऑफीस 0231-2644566 व 2644568, पी.बी.साबळे - 8482838504 यांचेशी संपर्क साधावा. 

तरी, कोल्हापूर शहर व परिसरातील भाविक प्रवासी नागरिकांनी या बससेवेचा लाभ घेऊन परिवहन उपक्रमास सहकार्य करावे असे आवाहन परिवहन उपक्रमामार्फत करणेत येत आहे.

▪️श्री दुर्गादर्शन यात्रेतील धार्मिक स्थळे खालीलप्रमाणे :
1. श्री लक्ष्मीदेवी लुगडी ओळ, 10 मिनिटे
2. श्री एकविरादेवी आझाद चौक 10 मिनिटे
3. श्री त्र्यंबोली देवी टेंबलाई हिल 20 मिनिटे
4. श्री उजळंबा देवी उजळाईवाडी 15 मिनिटे
5. श्री मुक्तांबिकादेवी साठमारी, 10 मिनिटे
6. श्री पद्मावतीदेवी जयप्रभा स्टुडीओ, 05 मिनिटे
7. श्री रेणूकादेवी मंगळवारपेठ 10 मिनिटे
8. श्री कात्यायनीदेवी कात्यायनी 15 मिनिटे
9. श्री प्रत्यंगिरा (फिरंगाई देवी) शिवाजी पेठ 15 मिनिटे
10. श्री कमलजादेवी उभा मारुती चौक 10 मिनिटे
11. श्री महाकालीदेवी शिवाजी पेठ 10 मिनिटे
12. श्री अनुगामिनीदेवी धुण्याची चावी परिसर 20 मिनिटे
13. श्री गजेंद्रलक्ष्मीदेवी ब्रम्हपूरी 15 मिनिटे
14. श्री अंबाबाईदेवी भवानी मंडप ----

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes